खेड ः लोटेमाळनजीक उत्पादन शुल्कची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः लोटेमाळनजीक उत्पादन शुल्कची कारवाई
खेड ः लोटेमाळनजीक उत्पादन शुल्कची कारवाई

खेड ः लोटेमाळनजीक उत्पादन शुल्कची कारवाई

sakal_logo
By

rat३०p२०.jpg
७२०९९
खेडः लोटेनजीक जप्त केलेल्या हातभट्टीच्या दारूसह संशयित.
---------
लोटेमाळनजीक उत्पादन शुल्कची कारवाई
३१५ लिटर हातभट्टी जप्त; हॉटेलसमोर रचला सापळा
खेड, ता. ३०ः मद्याची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ठिकठिकाणी तपासणीनाके व थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर गस्तीमोहीम राबवण्यात आली. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क खेड विभागामार्फत राष्ट्रीय महामार्गावर अचानक वाहन तपासणी व गस्त घालत असताना लोटेमाळनजीक कारमधून मद्याची वाहतूक करत असताना ३१५ लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त सूर्यवंशी व संचालक सुनील चव्हाण यांच्या आदेशान्वये तसेच बीएच तडवी विभागीय उपआयुक्त कोल्हापूर विभाग व रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक सागर धोमकर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली २९ डिसेंबरपासून राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर लोटेमाळ गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर हॉटेलसमोर सापळा रचला असता २९ डिसेंबरला संध्याकाळी पावणे आठच्या सुमारास चिपळूणहून खेडच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करत असताना एक संशयित राखाडी रंगाची इको (एमएच - ०८ - एजी - ४२६८) तपासणीसाठी थांबवून सदर वाहन तपासणी केली असता चालकाच्या मागील बाजूस ३५ लि. मापाचे काळे, पिवळे, निळे ९ कॅन दिसून आले. ते उघडून पाहिले असता हातभट्टी गावठी दारू असल्याचे आढळून आले. यामध्ये ३५ हजार ४०९ प्रमाणे एकूण ३१५ लिटर हातभट्टी गावठी दारू मिळून आली. असा गाडीसहित एकूण ३ लाख १७ हजार १०० एवढ्या किमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. मुद्येमालाचा मालक मिलिंद मोहन सुर्वे (गणेशवाडी, वालोपे, ता. चिपळूण) याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क खेड विभागाचे निरीक्षक सुनील आरडेकर दुय्यम निरीक्षक महादेव आगळे, दुय्यम निरीक्षक पांडुरंग पालकर, जवान अनुराग बर्वे, वाहनचालक अतुल वसावे यांनी भाग घेतला. तसेच गणपत जाधव व विजय सावंत यांनी कारवाईकामी मदत केली. गुन्ह्याचा तपास निरीक्षक सुनील आरडेकर करत आहेत.