राजापूर ःपर्यटन मोसमातही गंगा प्रवाही ही पर्वणीच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ःपर्यटन मोसमातही गंगा प्रवाही ही पर्वणीच
राजापूर ःपर्यटन मोसमातही गंगा प्रवाही ही पर्वणीच

राजापूर ःपर्यटन मोसमातही गंगा प्रवाही ही पर्वणीच

sakal_logo
By

७२१४५
७२१४६
७२१४७
पान १ साठी

पर्यटन मोसमातही प्रवाहित गंगा पर्वणीच
उन्हाळेत २०० दिवस वास्तव्य; लाखभर भक्तांनी घेतला स्नानाचा लाभ
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३० ः दिवसागणिक हवेतील उष्मा आणि तापमान वाढत असताना शहरानजीकच्या उन्हाळे येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्री पवित्र गंगामाईचे आगमन झाले आहे. तब्बल ७५ दिवसानंतर मे महिन्यामध्ये आगमन झालेल्या गंगामाईचे दोनशेहून अधिक दिवसानंतरही वास्तव्य कायम राहिले आहे. पर्यटनाच्या मोसमातही गंगेचा प्रवाह सुरू असल्याने पर्यटकांना ही पर्वणीच आहे. गंगामाईच्या या वास्तव्याच्या काळात लाखभर पर्यटकांनी गंगास्नानाचे पुण्य पदरी बांधून घेतले.
सद्यःस्थितीमध्ये मूळ गंगा, काशिकुंड, गायमुख आणि सर्व कुंडांमध्ये मुबलक प्रमाणात पाण्याचा प्रवाह आहे. या कालावधीमध्ये गंगातीर्थ क्षेत्राला राज्यासह परराज्यातील सुमारे एक लाखाहून अधिक भाविकांनी भेट देऊन गंगास्नानाची पर्वणी साधली आहे. शहरानजीकच्या उन्हाळे येथील तीर्थक्षेत्री गंगामाईचे होणारे आगमन आणि वास्तव्याचा काळ भाविकांच्यादृष्टीने एक धार्मिक पर्वणी असते. त्यामुळे गंगामाईच्या वास्तव्याच्या काळात विविध राज्यांतील भाविक या ठिकाणी पवित्र स्नान करण्यासाठी येतात. मात्र, कोरोनातील लॉकडाऊनमुळे अनेक भाविकांना गंगास्नानाची ही पर्वणी साधता आलेली नव्हती. अशा स्थितीमध्ये गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात आलेल्या गंगामाईचे साधरण अडीच-तीन महिन्यांच्या वास्तव्यानंतर फेब्रुवारीमध्ये गंगामाईने निर्गमन झाले होते. त्यानंतर, तब्बल ७५ दिवसानंतर १५ मे रोजी पुन्हा एकदा गंगामाईचे उन्हाळे तीर्थक्षेत्री आगमन झाले. त्यानंतर गंगामाईचे गेल्या दोनशेहून अधिक दिवसांपासून वास्तव्य राहिलेले आहे.
सद्यःस्थितीमध्ये मूळ गंगेसह गायमुख आणि सर्व कुंडांमध्ये मुबलक प्रमाणात पाण्याचा प्रवाह राहिला आहे. गंगामाईच्या या वास्तव्याच्या काळामध्ये राज्यासह परराज्यातील सुमारे एक लाखाहून अधिक भाविकांनी गंगास्थानाला भेट देऊन गंगास्नानाची पर्वणी साधली आहे. मे महिन्यामध्ये गंगास्थानी आलेल्या भाविकांची संख्या जास्त होती. त्यानंतर, सुरू झालेला पावसाळा, शेतीच्या कामामध्ये गुंतलेले शेतकरी आणि सुरू झालेल्या शाळा या साऱ्या स्थितीमध्ये गंगास्थानी येणाऱ्या भाविकांची संख्या काहीशी कमी झाली आहे.


पर्यटकांनी फुलली कुंड
दिवाळीनंतर पुन्हा एकदा जिल्ह्यातील पर्यटन फुलू लागले आहे. जिल्ह्याच्या विविध पर्यटनस्थळांसह सागरी किनाऱ्‍यावर येणाऱ्‍या पर्यटकांची पावले हळूहळू गंगा स्नानाकडे वळतील, असा अंदाज वर्तवला होता. त्याला वर्षअखेरीच्या आठवड्यात पुष्टी मिळाली आहे.