
बिजघरमध्ये पिसाळलेला बैल शिताफीने जेरबंद
rat30p28.jpg
72163
खेडः बैलाला पकडणारे वाईल्ड लाईफ फाउंडेशनचे सदस्य.
----------
बिजघरमध्ये पिसाळलेला बैल जेरबंद
खेड, ता. ३०ः तालुक्यातील बिजघर येथे श्रीकांत भोसले यांचा चवताळलेला बैल वाहनचालकासह नागरिकांना त्रास देत होता. अंगावर धावून जाणे, पाठलाग करणे, दुचाकीस्वारांचा पाठलाग करणे असे प्रकार घडत होते. यामुळे वाईल्डलाईफ फाउंडेशनने त्या बैलास शिताफीने पकडले. बैलाच्या या त्रासाला कंटाळून पोलिसात तक्रार दिली होती.
पोलिसांनी बैलाला पकडण्याची जबाबदारी छत्रपती वाईल्डलाईफ फाउंडेशनवर सोपवली. फाउंडेशनचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बैलाला पकडण्याचे कसोशीने प्रयत्न केले; मात्र तो दोन दिवस हाती लागत नव्हता. अथक प्रयत्नानंतर छत्रपती वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या सदस्यांनी बैलाला काबूत आणले. त्याला पकडून शांत केले. त्यानंतर मालकाच्या स्वाधीन करण्यात आले. फाउंडेशनचे सदस्य सर्वेश पवार, सूरज जाधव, रोहन खेडेकर, श्वेत चोगले, सुमीत म्हापळकर, भाऊ खेडेकर, विशाल सौंदर्य, अतिश उसरे यांनी बैलाला पकडण्याची कामगिरी केली.