जि.प.मधील अखर्चित निधी भोवला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जि.प.मधील अखर्चित निधी भोवला
जि.प.मधील अखर्चित निधी भोवला

जि.प.मधील अखर्चित निधी भोवला

sakal_logo
By

जिल्हा परिषदेमधील
अखर्चित निधी भोवला

चव्हाण बदली प्रकरण; सीईओंनी दिला होता अहवाल

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३० ः येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांच्या तडकाफडकी बदलीचे कारण आता स्पष्ट झाले आहे. चव्हाण या जिल्हा परिषदमध्ये कार्यकारी अभियंता असताना तब्बल २२ कोटीचा निधी अखर्चीत राहिल्याने परत गेला होता. त्याचा ठपका जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी त्यांच्यावर ठेवून तसा अहवाल शासनाला पाठवला होता. यामुळे बदली झाल्याचे समजते.
येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता चव्हाण यांची गुरुवारी तडकाफडकी बदली दापोली कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी अभियंता या पदावर करण्यात आली. यानंतर सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरू झाली; मात्र या बदली मागचे कारण स्पष्ट होत नव्हते; मात्र आज या बदली मागचे कारण स्पष्ट झाले आहे. चव्हाण या जिल्हा परिषदमध्ये कार्यकारी अभियंता या पदावर असताना महाविकास आघाडीच्या काळात तब्बल २२ कोटीचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला होता; पण हा निधी त्यावेळी अखर्चित ठेवण्यात आला होता. हा निधी अखर्चीत ठेवण्यामागचे कारण उलघडले नव्हते. हा अखर्चीत निधी शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात मागे गेला. निधी मागे गेल्याने अनेक विकासकामे ठप्प राहिली होती. यावरून अनेक तक्रारीही झाल्या होत्या. या तक्रारीवरून पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी सखोल चौकशी करून तसा अहवाल शासनाकडे दिला होता. या चौकशीत नायर यांनी निधी अखर्चीत राहाण्यामागे तत्कालीन कार्यकारी अभियंता याच जबाबदार असल्याचा ठपका ठेवला होता. या ठपक्या नंतर शासनाने चव्हाण यांची तडकाफडकी बदली केली आहे. दरम्यान, आज भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषद घेत चव्हाण यांच्या बदलीबाबत आरोप केले. ते म्हणाले, ‘‘चव्हाण यांच्याबद्दल एकच तक्रार नसून अनेक तक्रारी आहेत. त्या मर्जीतील ठेकेदाराला हाताशी धरून सर्व काम करत होत्या. याबाबतच्या तक्रारी आमच्याकडे होत्या. आंगणेवाडी येथील कामाचा निधी अखर्चीत ठेवण्यात आला होता.’’