Fri, Feb 3, 2023

मडुरा येथे आज
कुमार साहित्य संमेलन
मडुरा येथे आज कुमार साहित्य संमेलन
Published on : 30 December 2022, 3:31 am
मडुरा येथे आज
कुमार साहित्य संमेलन
बांदा, ता. ३० ः धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळातर्फे उद्या (ता.३१) मडुरा येथे नवा विद्यार्थी कुमार साहित्य संमेलन आयोजित केले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मडुरा येथे बॅ. नाथ पै स्मृती साहित्य नगरीत होणाऱ्या या कार्यक्रमाला पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार नीलेश राणे, ज्येष्ठ साहित्यिक हनुमंत चोपडेकर, संस्थेचे कार्याध्यक्ष मिलिंद तोरसकर आदी उपस्थित राहतील. यावेळी ग्रंथ दिंडी, शोभा यात्रेसोबतच कवी संमेलन, कथाकथन होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी, कवी दादा मडकईकर, विजय सावंत, सौ. अर्चना परब उपस्थित राहणार आहेत. यावेळी माजी विद्यार्थी व मुंबईतील शिक्षण निरिक्षक विजय सावंत यांचा सत्कार करण्यात येणार आहे.