दोडामार्गात पाच ठिकाणी ‘टाय’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोडामार्गात पाच ठिकाणी ‘टाय’
दोडामार्गात पाच ठिकाणी ‘टाय’

दोडामार्गात पाच ठिकाणी ‘टाय’

sakal_logo
By

72183
तळकट ः येथील उपसरपंचपदी भाजपचे रमाकांत गवस निवडून आल्याने त्यांचा एकनाथ नाडकर्णी यांनी सत्कार केला.

दोडामार्गात पाच ठिकाणी ‘टाय’

उपसरपंच निवडी; २० ग्रामपंचायतींसाठी बिनविरोध निवड

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ३० ः तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक आज झाली. यात २० उपसरपंच बिनविरोध तर ८ उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया घ्यावी लागली. पैकी पाच ठिकाणी ‘टाय’ झाल्याने सरपंचाच्या निर्णायक मताने व उर्वरित मतदान प्रक्रियेद्वारे उपसरपंच निवडून आले आहेत.
तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. यातील सरपंच थेट जनतेतून निवडून आले. उपसरपंच पदासाठी आज मतदान घेण्यात आले. उपसरपंच पदासाठी बहुतांश ग्रामपंचायतीतील नवनिर्वाचित सदस्य इच्छुक राहिल्याने तेथे निवडणूक प्रक्रिया राबवावी लागली. तर निम्म्याहून अधिक उपसरपंच बिनविरोध निवडून आले. कुंब्रल उपसरपंच पदासाठी अमित सावंत व करुणा कदम यांच्यात लढत झाली. कदम यांना एक व सावंत यांना पाच मते मिळाल्याने सावंत उपसरपंच पदी निवडून आले. कळणे उपसरपंच पदासाठी भिकाजी देसाई, विठ्ठल नाईक व प्रिया नाईक यांनी अर्ज भरले. प्रिया नाईक यांनी अर्ज मागे घेतल्याने देसाई व नाईक यांच्यात लढत झाली. दोघाही उमेदवारांना प्रत्येकी चार मते मिळाल्याने तेथे टाय झाली. अखेर सरपंचांच्या निर्णायक मताने देसाई विजयी झाले. कोनाळ उपसरपंच पदी रत्नकांत कर्पे व शुभ्रा लोंढे यांच्यात लढत झाली. कर्पे सहा मते घेऊन विजयी झाले. घोटगे उपसरपंच पदासाठी विजय दळवी व अजय दळवी यांच्यात लढत झाली. दोघांनाही प्रत्येकी चार मते मिळाल्याने तेथे टाय झाली. अखेर सरपंचांच्या निर्णायक मताने विजय दळवी विजयी झाले. झरेबांबर-आंबेली उपसरपंच पदासाठी शाम नाईक व सर्वेश माणगावकर यांच्यात लढत झाली. दोघांनाही प्रत्येकी पाच मते मिळाल्याने तेथे टाय झाली व अखेर सरपंचांच्या निर्णय मताने नाईक विजयी झाले. पिकुळे उपसरपंच पदासाठी नीलेश गवस व गिरिजा गवस यांच्यात लढत झाली. दोघांनाही प्रत्येकी पाच मते मिळाल्याने तेथे टाय झाली व अखेर सरपंचाच्या निर्णायक मताने निलेश गवस विजयी झाले. तळेखोल येथे महादेव नाईक व शाम गवस यांच्यात लढत झाली. नाईक यांना सहा व गवस यांना दोन मते मिळाली. त्यामुळे नाईक हे विजयी झाले. परमे-पणतुर्ली येथेही दोन उमेदवारांत टाय झाली व सरपंचाच्या निर्णय मताने दिया गवस विजयी झाल्या. बिनविरोध उपसरपंच असे ः फुकेरी-निलेश आईर, झोळंबे -विनायक गाडगीळ, तळकट- रमाकांत गवस, कोलझर -पांडुरंग राणे, मोरगाव- देविदास पिरणकर, आडाळी- परेश प्रकाश सावंत, सासोली -अनिरुद्ध फाटक, मणेरी -राया काळे, केर-भेकुर्ली- तेजस देसाई, मोर्ले -संतोष मोर्ये, घोटगेवाडी- सागर कर्पे, बोडदे -लीना फर्नांडिस, मांगेली- कृष्णा गवस, उसप- बळीराम नाईक, खोक्रल -अंजू गवस, वझरे-गिरोडे- चंद्रकांत नाईक, विर्डी -एकनाथ गवस, आयी- भदी गवस, माटणे- चांदणी शिरोडकर, आंबडगाव -मोहन गवस.
------------
चौकट
भाजपने केला वर्चस्वाचा दावा
तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींवर भाजपचा उपसरपंच विराजमान झाल्याचा दावा तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी केला. त्यांनी उपसरपंचांची यादी जाहीर केली आहे. फुकेरी, झोळंबे, तळकट, मोरागाव, आडाळी, कळणे, सासोली, कुंब्रल, परमे, मणेरी, उसप, वझरे, माटणे, तळेखोल, खोंक्रल, बोडदे खानयाळे या गावांबाबत त्यांनी दावा केला आहे.