केळकर महाविद्यालय संशोधन परिषदेत तृतीय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केळकर महाविद्यालय संशोधन परिषदेत तृतीय
केळकर महाविद्यालय संशोधन परिषदेत तृतीय

केळकर महाविद्यालय संशोधन परिषदेत तृतीय

sakal_logo
By

72106
देवगड ः येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना यश प्राप्त झाले.

केळकर महाविद्यालय संशोधन परिषदेत तृतीय

देवगडातील मासेमारी समस्या आणि संभाव्यता’चे सादरीकरण

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३० ः मुंबई विद्यापीठ स्तरावर आयोजित केलेल्या यंदाच्या १७ व्या ‘आविष्कार’ संशोधन परिषदमध्ये विद्यापीठ क्षेत्रातील ११ विभागातून सादर करण्यात आलेल्या एकूण ४२ प्रकल्पातून येथील स. ह. केळकर महाविद्यालयाच्या प्रकल्पाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. ‘देवगड तालुक्यातील मासेमारी : समस्या आणि संभाव्यता’ हा प्रकल्पाचा विषय होता. आता विद्यापीठीय समूहातून राज्यस्तरावर प्रतिनिधीत्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
मुंबई विद्यापीठ स्तरावर विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक वृत्तीला चालना देऊन योग्य मंच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, ‘आविष्कार’ या संशोधनात्मक परिषदेचे आयोजन करण्यात येते. या परिषदेत विद्यार्थी विविध विषयावर आपला संशोधनात्मक अहवाल सादर करतात. यावर्षी आयोजित केलेल्या १७ व्या आविष्कार संशोधन परिषदेमध्ये येथील महाविद्यालयाच्या भूगोल विभागातील दोन संशोधनात्मक अहवाल विद्यापीठ स्तरावर अंतिम फेरीसाठी निवडले गेले होते. यामध्ये ‘अन्न जादाचे पण लाखमोलाचे’ -सहभागी विद्यार्थी -दत्ताराम राणे, सानिका राजम, सिद्धी राजम. ‘देवगड तालुक्यातील मासेमारी : समस्या आणि संभाव्यता’ सहभागी विद्यार्थिनी -तनुजा तानवडे, वर्षा गावकर यांचा समावेश होता. यासाठीची अंतिम फेरी सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे येथे झाली. यामध्ये मुंबई विद्यापीठ क्षेत्रातील ११ विभागातून एकूण ४२ प्रकल्प सादर करण्यात आले. त्यातून ‘देवगड तालुक्यातील मासेमारी : समस्या आणि संभाव्यता’ या प्रकल्पाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. या विद्यार्थ्यांना आता विद्यापीठीय समूहातून राज्यस्तरावर प्रतिनिधीत्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे. भूगोल विभागातील या दोन्ही प्रकल्पांना भूगोल विभागातील गुरुप्रसाद घाडी यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशानिमित्त महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सुखदा जांबळे आदींनी शुभेच्छा दिल्या.