शिवराज्याभिषेक, ‘नवदुर्गा दर्शन’ लक्षवेधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवराज्याभिषेक, ‘नवदुर्गा दर्शन’ लक्षवेधी
शिवराज्याभिषेक, ‘नवदुर्गा दर्शन’ लक्षवेधी

शिवराज्याभिषेक, ‘नवदुर्गा दर्शन’ लक्षवेधी

sakal_logo
By

72229
कुडाळ ः महोत्सवात एम. जे. डान्स अॅकेडमीने सादर केलेला शिवराज्याभिषेक सोहळा. (छायाचित्र ः अजय सावंत)

शिवराज्याभिषेक, ‘नवदुर्गा दर्शन’ लक्षवेधी

कुडाळ लायन्स महोत्सव; विविध नृत्याविष्कारांनी रसिक मंत्रमुग्ध

कुडाळ, ता. ३१ ः लायन्स क्लब ऑफ कुडाळच्या दुसऱ्या दिवसाच्या महोत्सवात हजारो रसिकांनी हजेरी लावली. एम. जे. डान्स अॅकेडमीच्या विविध नृत्याविष्कारांनी महोत्सव यादगार ठरला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा, ‘नवदुर्गा दर्शन’सह ‘महाराष्ट्राच्या लोकधारा’ने रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्गचा फेस्टिवल हजारोंची उपस्थिती आणि विविध नृत्याविष्कारांनी यादगार ठरला. सावंतवाडी येथील एम. जे. डान्स अॅकॅडमीचे संचालक महेश जांभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ३५ कलाकारांनी विविध नृत्याविष्कार सादर करीत कार्यक्रमात उत्तरोत्तर रंगत भऱली. कार्यक्रमाची सुरुवात गणेश नृत्याने झाली. भारतीय शास्त्रीय, लोकनृत्यासोबत पश्चिमी नृत्य कलेचा आविष्कार रसिकांनी अनुभवला. प्रत्येक नृत्यास साजेशी वेशभूषा, विविधांगी कलाविष्कार यामुळे हा अडीच ते तीन तासांचा कार्यक्रम डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.
महोत्सवाला महाराष्ट्र व गोवा राज्याचे बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड. संग्राम देसाई, सामाजिक कार्यकर्ते अमित सामंत, युवा उद्योजक विशाल परब, पत्रकार शेखर सामंत, कुडाळ तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष श्रीराम शिरसाट तसेच मालवण व सावंतवाडी येथील लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देत महोत्सवाचे भरभरून कौतुक केले. सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षांचे स्वागत या अनुषंगाने हा होणारा लायन्सचा महोत्सव पर्यटनाला चालना देणारा ठरेल. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात असे महोत्सव महत्त्वाचे ठरणार आहेत. भविष्यात अशा उपक्रमांस नेहमीच सहकार्य राहील, असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. महोत्सवात सिंधुदुर्गसह पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा येथील इंडस्ट्रीयल, ऑटो एक्स्पो खाद्यपदार्थ व जनरल स्टॉल्स आदी मिळून ८७ स्टॉल सहभागी झाले.