
गंगेने प्रसाद दिला, मुलाचे नाव गंगाप्रसाद !
rat३११६.txt
बातमी क्र...१६
(आज पासून नवीन सदर आहे, नवीन लोगो करावा ही विनंती)
(संदर्भासाठी २९ डिसेंबर टुडे चार, २४ डिसेंबर टुडे तीन)
आख्यायिकांचे आख्यान .......... लोगो
rat३१p८.jpg ः
७२२४०
धनंजय मराठे
इन्ट्रो
---
आख्यायिका या कधी विश्वसनीय तर बऱ्याचवेळा अविश्वसनीय. परंपरेने सुरू असलेल्या रूढी, प्रथा लोकजीवनात मान्य पावलेल्या गोष्टी बरेचवेळा त्याला अगम्य वा अतर्क्य अशा गूढतेचे वलय आणि त्यावर चालणारी कधी कधी त्यापासून आत्मविश्वास मिळवणारी जनता वा भक्तजन यामुळे आख्यायिकांना बळकटी येते. कधीकधी त्या अभिनिवेषाने सांगितल्या जातात. काहीवेळा त्यातून चतुराई आणि प्रसंगावधानाचे महत्वही कळते तर काहीवेळा अंधश्रद्धेला कवटाळल्यासारखेही होते. जाणत्यांनी अशा आख्यायिकांकडे गंभीर आणि गमतीदारपणे बघावे. सद्यःस्थितीच्या आयामात त्याकडे कसे पाहावे यावर भाष्य करणाऱ्या सदरातील आजचा पहिला लेख-
- धनंजय मराठे, राजापूर
manojmarathe४@gmail.com
---
गंगेने प्रसाद दिला, मुलाचे नाव गंगाप्रसाद !
राजापूरची गंगा एक नैसर्गिक नवल म्हणून पहिले जाते. दर तीन-चार वर्षांनी अवतीर्ण होणारी गंगा भाविकांचे श्रद्धास्थान. गंगामाई अवतीर्ण झाली की, भक्तांचा महापूर या ठिकाणी पाहायला मिळतो. कोकणातून विविध भागातून घाटमाथ्यावरून अनेक भाविक या गंगामाईच्या दर्शनाला, चौदा कुंडातील स्नानासाठी येत असत. भावभक्तीच्या या भाविकतेत नवस आलाच. एखाद्या देवतेने आपली विशिष्ट इच्छा पूर्ण केल्यास आपण तिला विशिष्ट अर्पण करू किंवा तिच्यासाठी विशिष्ट व्रत करू, असे अभिवचन देणे म्हणजे नवस. असाच नवस एका महिला भक्ताने गंगेला केला.
पंढरपूर येथील एक विवाहित महिला होती. तिला मूळबाळ नसल्यामुळे ती दुःखी कष्टी होती. राजापुरात गंगामाई अवतीर्ण झाल्याचे तिला समजले. तिने नवऱ्याजवळ गंगामाईच्या दर्शनासाठी आग्रह धरला. पतीचा होकार मिळताच ती उभंयता राजापूर येथील गंगातीर्थावर आली. गंगास्नान करून, गंगापूजन करून मनोभावे हात जोडून नवस केला. ''हे गंगामाते तूझ्या कृपेने मला मूल व्हावे असे मी तुझ्याकडून मागणे मागत आहे. माझी इच्छा तू पूर्ण कर. मला झालेले अपत्य मी तूला अर्पण करेन.'' असा नवस करून ती उभयता पंढरपूला परत गेली. यथावकाश तिला मुलगा झाला. तीन वर्षांनी प्रकट होणारी गंगा प्रकट झाल्याचे तिला समजले. तिने घरातील सर्व वडिलाधाऱ्यांना नवस कथन केला आणि तो पूर्ण करण्याचा निर्धारही सांगितला. विनवणी केली. अशावेळी सर्वच वडीलधारी मंडळी कुटुंबासह निरागस, निष्पाप अशा चार महिन्यांच्या बालकासह राजापुरात गंगेला आले. गंगापुत्रांना तिने केलेल्या नवसाची सांगता करण्यासाठी आले आहे म्हणून सांगितले. केलेला नवस ऐकून गंगापुत्र घाबरून गेले. त्यांनी पुष्कळ प्रकारे समजावणीचा प्रयत्न केला; परंतू ती बाई हटूनच बसली. एका जाणत्या गंगापुत्राने एक शक्कल काढली. आपण राजापुरात जाऊया. येथे एक वेदशास्त्रसंपन्न पंडित आहेत. ते सांगतील तसे आपण सर्वांनी करूया.
गंगापुत्र व ते कुटुंब त्यांच्याकडे आले. बाईंनी आपला नवस कथन केला. गंगापुत्रांनी आपली अडचण सांगितली. शास्त्रीजी धर्मशास्त्र अवगत होते. ते म्हणाले, गंगा नवसाला पावली आहे. केला नवस सफल झाला आहे. त्यांची सांगता त्याप्रमाणेच झाली पाहिजे. गंगापुत्र काळजीत पडले. अर्पण केलेले बालक कोणी सांभाळावे. बालकाचे काही वाईट झाले तर? शास्त्रीजी म्हणाले, सर्व जबाबदारी माझी. मी उद्या गंगेवर येतो. पौरोहित्य करून नवसाची सांगता बाईकडून करवून घेतो. आपण निश्चिंत राहावे. आपण सर्वांनी गंगेवर जावे. शास्त्रीजी गंगेवर आले. बाई स्नान करून तयार झाल्या. संकल्पपूजन झाले. शास्त्रीजींनी दोन गंगापुत्रांना धोतर आणण्यास सांगून ते धोतर काशीकुंडातील पाण्यात कसे धरावे ते सांगितले. बाईंना बालकाला घेऊन काशीकुंडाच्या काठावर आणले. तिला सांगितले, मी मंत्र म्हणतो. तूला खूण करताच तू अलगद तुझ्या हाताने मूल पाण्यात सोड. सूचनेप्रमाणे तिने बाळ पाण्यात सोडले. ते धोतरात पडताच गंगापुत्रांनी त्वरित धोतर वर उचलले. शास्त्रीजींनी गंगापुत्रांना बाळ घेण्यास सांगितले. ते बाईंना म्हणाले, आता सांगतापूर्ती व प्रसाद घेण्यासाठी गंगापूजनाला बसा. पुजेने नवसाची सांगता झाली. आता प्रसाद घ्या म्हणून त्यांनी गूळ-खोबरे आणण्यास सांगून बाळाला आपल्या हातात घेतले. साडीचोळीबरोबरच त्या मुलालाही पदरात ठेवले. ते एवढेच म्हणाले, गंगेने प्रसाद दिला आहे. मुलाचे नाव ''गंगाप्रसाद''. आता आनंदाने घरी जा.