पर्यटन महोत्सवासाठी कणकवली येथे लगबग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटन महोत्सवासाठी
कणकवली येथे लगबग
पर्यटन महोत्सवासाठी कणकवली येथे लगबग

पर्यटन महोत्सवासाठी कणकवली येथे लगबग

sakal_logo
By

72258
कणकवली ः शहरातील उपजिल्‍हा रूग्‍णालयासमोरील मैदानात नगरपंचायतीचा पर्यटन महोत्‍सव होणार आहे. याठिकाणच्या कामाचा प्रारंभ आज सामाजिक कार्यकर्ते प्रकाश परब यांनी केला. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे आदी.

पर्यटन महोत्सवासाठी
कणकवली येथे लगबग

नगरपंचायतीतर्फे विविध कामांना प्रारंभ

कणकवली, ता.३१ : येथील नगरपंचायतीच्या पर्यटन महोत्सव २०२३ च्या महोत्सव स्थळाच्या ठिकाणी मंच उभारणीसह अन्य कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. शहरातील परबवाडी येथील ज्‍येष्‍ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश परब यांनी श्रीफळ वाढवून या कामाचा श्रीगणेशा केला.
कणकवली नगरपंचायत चा पर्यटन महोत्सव ५ जानेवारी ते ८ जानेवारी पर्यंत चालणार आहे. यानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. याकामाच्या शुभारंभ प्रसंगी नगराध्यक्ष समीर नलावडे, गटनेते संजय कामतेकर, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नगरसेवक अभिजीत मुसळे, माजी नगरसेवक बंडू गांगण, अण्णा कोदे, पप्पू पुजारे, लक्ष्मण घाडीगावकर, पंकज पेडणेकर, अजय घाडी, गौरव नेमळेकर आदी उपस्थित होते.