चिपळूण ःखांदाटपाली ग्रामपंचायतीवर बहुउद्देशीय मंचाचे वर्चस्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ःखांदाटपाली ग्रामपंचायतीवर बहुउद्देशीय मंचाचे वर्चस्व
चिपळूण ःखांदाटपाली ग्रामपंचायतीवर बहुउद्देशीय मंचाचे वर्चस्व

चिपळूण ःखांदाटपाली ग्रामपंचायतीवर बहुउद्देशीय मंचाचे वर्चस्व

sakal_logo
By

ratchl304.jpg-
72276
चिपळूणः विजयी निशाणी दाखवताना सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी.
------------------
खांदाटपाली ग्रामपंचायतीवर
बहुउद्देशीय मंचाचे वर्चस्व
सरपंच तन्वी खेडेकर, उपसरपंच गमरेंनी स्वीकारला कार्यभार
चिपळूण, ता. ३१ः तालुक्यातील खांदाटपालीच्या सरपंचपदी तन्वी खेडेकर यांची बिनविरोध निवड झाली होती. उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सचिन गमरे यांना संधी मिळाली. नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांनी गुरुवारी (ता. २९) पदभार स्वीकारला.
खांदाटपाली येथे बहुउद्देशीय विकास मंचाच्या माध्यमातून ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. संस्कृती खेडेकर, शारदा घोले या सदस्यपदी भरघोस मताधिक्क्याने निवडून आल्या आहेत. तन्वी खेडेकर या सरपंचपदी तर सदस्यपदी सचिन गमरे, सचिन वाईल, एकनाथ महाडिक, श्रृती घाडगे बिनविरोध निवडून आले होते. गुरुवारी उपसरपंचपदाची निवड करण्यात आली. सचिन गमरे यांच्याकडे सर्वानुमते उपसरपंचपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. तन्वी खेडेकर यांनी सरपंच तर सचिन गमरे यांनी उपसरपंचपदाचा पदभार स्वीकारला आहे. गावचा सर्वांगीण विकास साधून ग्रामस्थांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू, अशी ग्वाही नवनिर्वाचित सरपंच, उपसरंपचांनी दिली. खांदाटपाली येथे दोन जागांसाठी निवडणूक लागली. मतमोजणीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसह शिवसेना ठाकरे गट व भाजपनेही येथे दावा केला होता. ग्रामपंचायतीवर दावा करण्यासाठी राजकीय पक्षांची रस्सीखेच सुरू होती. मात्र शेवटी खांदाट बहुउद्देशीय मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीवर कोणत्याही एका राजकीय पक्षाचे प्राबल्य नसल्याने सांगत मंचाच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवली. त्यास ग्रामस्थांनी चांगली साथ दिल्याने सत्ता मिळाल्याचे सांगितले होते.