हेवेदावे विसरून चांगले काम करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हेवेदावे विसरून चांगले काम करा
हेवेदावे विसरून चांगले काम करा

हेवेदावे विसरून चांगले काम करा

sakal_logo
By

rat३१२६.txt

(पान ६ साठी)

फोटो ओळी
-ratchl३०३.jpg ः
७२१२४
चिपळूण ः ओमळी येथे सरपंच प्राजक्ता जाधव व उपसरपंच जितू कदम व सर्व सदस्यांचे अभिनंदन करताना सुनील जाधव.
--

हेवेदावे विसरून चांगले काम करा

सुनील जाधव ; ओमळीतील सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार

चिपळूण, ता. ३१ ः ग्रामपंचायत निवडणूक संपली. आता आपापसातील हेवेदावे व कटुता विसरून आपल्या भागात चांगले काम कसे होईल यासाठी प्रयत्न करा. कोणतीही उणीधुणी न काढता सर्वांनी वाडीवार विकासकामाचा आराखडा बनवा. विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन समन्वयाने काम करा. आमदार भास्कर जाधव व आपण निधी देण्यास कोठेही कमी पडणार नाही, असे आश्वासन तुरंबवचे माजी सरपंच सुनील जाधव यांनी दिले. त्यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच प्राजक्ता जाधव, उपसरपंच विवेक उर्फ जितू कदम यांच्यासह सर्व सदस्यांना सन्मानित करण्यात आले.
ओमळी ग्रामपंचायतीत नवनिर्वाचित सरपंच प्राजक्ता जाधव यांनी पदभार स्वीकारला. त्यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत जितू कदम यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. या वेळी निवडणूक निरीक्षक सचिन धकाते व ग्रामसेवक सुनील राठोड, ग्रामपंचायत सदस्य शशिकला सावंत, प्रतिभा जोशी, स्वाती देसाई, यशश्री सकपाळ, पूजा वावरे, सदस्य दिलीप जाधव, जनार्दन पवार, सतीश कदम उपस्थित होते.
ग्रामपंचायत सदस्या यशश्री सकपाळ, प्रतिभा जोशी, उपसरपंच जितू कदम, शिवसेना सहसंपर्कप्रमुख शामराव साळुंखे, माजी उपसभापती सुभाष जाधव यांनी आपले मनोगत मांडले. निवडणुकीच्या काळात चांगले काम करून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पॅनेल विजयी झाले. त्याबद्दल उपविभागप्रमुख चंद्रकांत जाधव, शाखाप्रमुख नीलेश घडशी, शाखाप्रमुख विजय पवार, युवासेना विभागप्रमुख सुयोग कदम यांचा सुनील जाधव व शामराव साळुंखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.