विवेक गुरव अध्यक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विवेक गुरव अध्यक्ष
विवेक गुरव अध्यक्ष

विवेक गुरव अध्यक्ष

sakal_logo
By

rat३११५.txt

( पान ५ साठी, संक्षिप्त)

टायर पंक्चर असोसिएशन अध्यक्षपदी विवेक गुरव

राजापूर ः तालुक्यातील टायरविक्रेते आणि पंक्चर दुरुस्ती करणाऱ्‍या व्यावसायिकांची नुकतीच ओणी येथे नुकतीच बैठक झाली. या बैठकीमध्ये राजापूर टायर पंक्चर असोसिएशन कमिटीची स्थापना करण्यात आली असून, या कमिटीच्या अध्यक्षपदी विवेक गुरव यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीला शैलेश नागरेकर, सुरज कुवळेकर, प्रसन्न गुरव, नाना मोंडे आदी पंक्चर वर्कर उपस्थित होते. निवडण्यात आलेल्या कार्यकारणीमध्ये अध्यक्ष विवेक गुरव, उपाध्यक्ष मन्या गुरव, सचिव अनिकेत जाधव, खजिनदार प्रथमेश मोंडे, प्रवीण कातकर, सदस्य प्रदीप खानविलकर, रहमत, विशाल शेट्टी, ज्येष्ठ सल्लागार हरिभाऊ गुरव, माध्यम प्रतिनिधी राजू जोगले, गोकुळ कांबळे, अ‍ॅड. समीर कुंटे. नूतन कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
---
विद्यार्थींनीकडून सोन्याचा दागिना प्रामाणिकपणे परत

राजापूर ः शहरातील आरएसपीएम या इंग्रजी माध्यमातील शाळेमध्ये चौथीमध्ये शिकणाऱ्‍या आर्या मांडवे हिने शाळा परिसरामध्ये सापडलेली सुमारे सात ते आठ हजार रुपये किंमतीची सोन्याची वस्तू मुख्याध्यापक नीलेश पवार यांच्याकडे सुपूर्द करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले. दरम्यान त्या वस्तूची शहानिशा व संपूर्ण चौकशी करून ज्याची ती वस्तू होती त्याला ती प्रशाळेकडून सुपूर्द करण्यात आली. आर्याच्या या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरातून व प्रशालेच्यावतीने कौतुक करण्यात येत आहे.
--

काकापीर क्रीडा मंडळाच्यावतीने क्रिकेट स्पर्धा

राजापूर ः सौंदळ येथील काकापीर क्रीडा मंडळाच्यावतीने फेब्रवारीमध्ये खुल्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सौंदळ येथील नवजीवन उर्दू हायस्कूल येथे होणार आहे. ज्या संघांना या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी आपली नावे मंडळाचे अध्यक्ष मुसब्बीर टोले, अशरफ नाईक, मुनव्वर मापारी यांच्याशी संपर्क साधावा.
---

क्रीडास्पर्धा बक्षिस वितरण गुरूवारी
राजापूर ः शहरातील राजापूर हायस्कूल आणि गोडे-दाते कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रम आणि वार्षिक क्रीडा स्पर्धेचा बक्षीस समारंभ गुरुवारी (ता. ५) सकाळी ८.३० वा. होणार आहे. कार्यक्रमाला प्रसाद देवस्थळी हे उपस्थित राहणार असून उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशालेच्या वतीने करण्यात आले आहे.