साडवली ः श्रीपाद सदाशिव सामंत यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडवली ः श्रीपाद सदाशिव सामंत यांचे निधन
साडवली ः श्रीपाद सदाशिव सामंत यांचे निधन

साडवली ः श्रीपाद सदाशिव सामंत यांचे निधन

sakal_logo
By

-rat३१p१.jpg ः
72233
श्रीपाद सदाशिव सामंत
-------------
श्रीपाद सामंत यांचे निधन
साडवली, ता. ३१ः संगमेश्वर सकाळ पुनर्वसन वसाहतमधील रहिवाशी श्रीपाद सामंत (वय ८६) यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. सामाजिक व राजकीय कार्यात ते अग्रेसर होते.
श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी स्थापन केलेल्या जनसंघाच्या कोल्हापूर कार्यकारिणीतील पहिल्या ११ सदस्यांपैकी एक सदस्य होते. १९५६-६५ जनसंघ कोल्हापूर शहरमंत्री (शहर सेक्रेटरी) म्हणून काम पाहिले. शहर जनसंघ बांधणीत मोलाचे योगदान दिले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भारत -पाकिस्तान कराराविरोधात मोर्चात सामील, निधी संकलनासाठी मदत केली होती. १९६७ ला जनसंघ उमेदवार श्रीकृष्ण भिडे यांच्या प्रचारमाध्यमातून संगमेश्वर येथे संघकार्याला सुरवात केली. १९६७ पासून जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्षाच्या प्रचारकार्यात सहभाग होता.
कलम ३७० हटाव मोहिमेत सहभाग, आणीबाणीप्रसंगी भूमिगत कार्य केले. १९९५ महालक्ष्मी रेसकोर्सवरील भाजपा महाधिवेशनप्रसंगी उपस्थित होते. अटलबिहारी यांच्या मृत्यूनंतर काही दिवस त्यांनी जेवण सोडले होते. पक्षाबद्दल आत्यंतिक भावनिकता, शाकाहार आणि प्राणीप्रेम सामंत यांनी शेवटपर्यंत जपले. शुक्रवारी दुपारी सामंत यांच्यावर संगमेश्वर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी संगमेश्वर, देवरूखमधील नागरिक उपस्थित होते. सामंत यांच्या पश्चात मुलगा अमित, विवाहित मुलगी असा परिवार आहे.