विद्यार्थी, अभ्यासकांसाठी सुरू होतेय अभ्यासिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थी, अभ्यासकांसाठी सुरू होतेय अभ्यासिका
विद्यार्थी, अभ्यासकांसाठी सुरू होतेय अभ्यासिका

विद्यार्थी, अभ्यासकांसाठी सुरू होतेय अभ्यासिका

sakal_logo
By

rat३१p१६.jpg
७२२९५
रत्नागिरीः नगर वाचनालयाची देखणी वास्तू.
-------------
विधायक---लोगो

विद्यार्थी, अभ्यासकांसाठी सुरू होतेय अभ्यासिका
अॅड. पटवर्धन ; रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचा उपक्रम, संदर्भग्रंथही हाताळता येणार
रत्नागिरी, ता. ३१ ः महाराष्ट्रातील सर्वात जुने वाचनालय असणाऱ्या रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात विद्यार्थी, अभ्यासिकांसाठी अभ्यासिका सुरू करण्यात येत आहे. नववर्षाच्या प्रारंभी २ जानेवारीला ही अभ्यासिका सेवेत रुजू होणार आहे. स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणारे विद्यार्थी, जिज्ञासू याचा लाभ घेऊ शकतात. सकाळी ९ ते सायं. ७ वाजेपर्यंत अभ्यासिकेत अभ्यास करता येणार असून या वेळी संदर्भग्रंथही हाताळता येतील, अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय हे रत्नागिरीतील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात जुने वाचनालय आहे. वाचनालयाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या अनेकविध उपक्रमांमुळे ते जनमानसात सुपरिचित आहे. २ जानेवारीपासून वाचनालय अजून एक नवीन उपक्रम सुरू करत आहे. आजच्या काळात स्पर्धा परीक्षेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. अनेकांच्या मनात सरकारी नोकरी मिळणे, आयएएस, आयपीएस अधकारी बनण्याचे स्वप्न असते. त्यासाठी आवश्यक असणारे परिश्रम घ्यायची तयारी असते. ही जिद्द घेऊन ते नेटाने अभ्यास करतात. केवळ परीक्षेच्या दिवसातच नव्हे तर इतरवेळी देखील अभ्यासासाठी वाचनालयाच्या मुक्त वाचन विभागात विद्यार्थी वाचक सातत्याने येतात, या अनुभवातून प्रेरणा घेऊन अभ्यासिका उपक्रम सुरू करत असल्याचे अॅड. पटवर्धन म्हणाले.
वाचनालयातील वातावरण व वाचनालयाची मध्यवर्ती जागा अभ्यासासाठी उत्तम आहे. वाचनालयाचा मुक्त वाचन विभागाला वेळेची मर्यादा असल्याने दुपारी वाचनालयाबरोबर वाचन विभागही बंद केला जात होता. त्यामुळे अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वयंअध्ययनात खंड पडत होता. या सर्वांचा विचार करता २ जानेवारीपासून वाचनालयाने वाचन विभाग अन्य ठिकाणी हलवून या जागेचा वापर अभ्यासिकेसाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. सलग एकमार्गी अभ्यास करता यावा म्हणून ही अभ्यासिका नाममात्र शुल्क आकारून विद्यार्थांसाठी उपलब्ध असेल. वाचनालयात नव्याने सुरू होणाऱ्या अभ्यासिकेत विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक सोयीसुविधा उपलब्ध असतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

चौकट
संदर्भ पुस्तकेही देणार
अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना संदर्भासाठी लागणारी व वाचनालयात उपलब्ध असलेली पुस्तके उपलब्ध करून दिली जातील. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार वाचनालयामार्फत सवलतीच्या दरात पुस्तके मागवून दिली जातील. जागेच्या मर्यादेमुळे प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. विद्यार्थ्यांनी वाचनालयात संपर्क साधून प्रवेश निश्चित करून अभ्यासिकेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.