नळेकर कुटुंबीयांना बॅंक विमापत्र प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नळेकर कुटुंबीयांना बॅंक विमापत्र प्रदान
नळेकर कुटुंबीयांना बॅंक विमापत्र प्रदान

नळेकर कुटुंबीयांना बॅंक विमापत्र प्रदान

sakal_logo
By

पारितोषिकासाठी विद्यार्थ्यांना आवाहन
वेंगुर्लेः मराठी माध्यमाच्या हायस्कूलमधून २०२१-२२ मध्ये इंग्रजी विषयात दहावीत जिल्ह्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना वेतोरे येथील सातेरी हायस्कूलमध्ये (कै.) दीनानाथ नाईक पारितोषिक देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील हायस्कूलमधील इंग्रजी विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याध्यापक संजय परब यांनी केले आहे.
...............
नळेकर कुटुंबीयांना बॅंक विमापत्र प्रदान
वेंगुर्लेः प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने राबविली जाते. या योजनेंतर्गत वजराट येथील हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालेले वासुदेव नारायण नळेकर यांच्या वारस पत्नी वंदना नळेकर यांना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे येथील संचालक विद्याधर परब (तळवडे) यांच्या हस्ते दोन लाखाचे विमापत्र बँकेच्या कामळेवीर शाखेत सुपूर्द करण्यात आले. नळेकर यांनी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत विमा उतरविला होता. विम्याची रक्कम मिळण्यासाठी बँकेकडून झालेल्या प्रयत्नामुळे दोन लाख रुपये बँकेकडे जमा झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. त्यामुळे त्यांची वारस पत्नी वंदना यांना विम्याचे पत्र प्रदान करण्यात आले.
.................
कृषी महोत्सवामध्ये सहभागाचे आवाहन
ओरोसः महाराष्ट्र शासन, कृषी विभाग तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद यांच्या समन्वयाने महाराणा प्रतापसिंह चौक परिसर, सिल्लोड येथे १ ते ५ जानेवारी या कालावधीत राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित केला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी वीरेश अंधारी यांनी केले आहे. राज्यातील शेतकऱ्यांची शाश्वत प्रगती व्हावी, शेतमालाला चांगला बाजार भाव मिळावा, शेतमाल उद्योग प्रक्रियेला चालना मिळावी, शेतकरी व वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ यांच्यामध्ये थेट संवाद व्हावा, यासाठी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात हे प्रदर्शन होत आहे.
...................
तळवडेत ८ ला शेतकरी मेळावा
सावंतवाडीः सहयोग ग्रामविकास मंडळ माजगाव आणि ग्रामपंचायत तळवडे यांच्यावतीने ८ जानेवारीला भव्य शेतकरी बागायतदार मेळावा आयोजित केला आहे. तळवडे येथील श्री जनता विद्यालय येथे सकाळी १० वाजता हा मेळावा होणार आहे. यावेळी पंचक्रोशीतील अनुभवी प्रगतशील शेतकरी व बागायतदारांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या मेळाव्याला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सावंतवाडी संस्थांच्या राणीसाहेब शुभदा देवी भोसले, कुलगुरू संजय सावंत, कोकण कृषी विद्यापीठाचे प्रमुख बाळासाहेब सावंत, संचालक प्रमोद सावंत, यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
.................