संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

rat३११०. txt

(पान ५ साठी, संक्षिप्त)

नाटककार विद्याधर गोखले जन्मशताब्दीनिमित्त गीतरंग

रत्नागिरी ः सुप्रसिद्ध नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाट्यगीतांचा कार्यक्रम विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठान आयोजित आणि खल्वायन रत्नागिरीनिर्मित विद्याधर गीतरंग हा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम विनामूल्य येथीलअसून गुरूकृपा मंगल कार्यालय, पऱ्याची आळी-बाजारपेठ येथे ४ जानेवारीला सायं. ६ ते ८.३० या वेळेत होणार आहे. या कार्यक्रमात विद्याधर गोखले यांच्या शाब्बास बिरबल शाब्बास, मंदारमाला, सुवर्णतुला, मेघमल्हार, जय जय गौरीशकंर, पंडितराज जगन्नाथ, मदनाची मंजिरी, स्वरसम्राज्ञी, बावनखणी या नाटकातील गाजलेल्या नाट्यपदांचा समावेश आहे. येथील गायक चैतन्य गोडबोले, वरद केळकर, स्मिता करंदिकर, श्वेता जोगळेकर हे नाटककार गोखले यांच्या गाजलेल्या नाटकातील नाट्यपदे सादर करणार करणार आहेत. या कार्यक्रमाला प्रसिद्ध तबलावादक हेरंब जोगळेकर, हार्मोनियम अमित ओक, ऑर्गनसाथ श्रीरंग जोगळेकर तर प्रदीप तेंडुलकर आणि दीप्ती कानविंदे या निवेदन करणार आहेत. या विनामुल्य कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन खल्वायन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
--

फोटो ओळी
-rat३१p२.jpg ः
७२२३४
रत्नागिरी ः कामगार कल्याण केंद्रातर्फे ताणतणाव मुक्ती कार्यशाळेत मार्गदर्शन करताना मान्यवर.
---
कामगार कल्याण केंद्रातर्फे ताणतणावमुक्ती कार्यशाळा

रत्नागिरी ः महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ विभागीय कार्यालय ठाणे अंतर्गत गट कार्यालय चिपळूण कामगार कल्याण केंद्र रत्नागिरीच्यावतीने कामगारांकरिता प्रशासकीय गतिमानता अंतर्गत ताणतणाव मुक्ती कार्यशाळा आस्थापनामध्ये उत्साहात झाली. यावेळी प्रमुख पाहुणे चंद्रशेखर युनिट हेड, कांबळे, विठ्ठल कौतेकर, विवेक कौतेकर, संतोष शिंदे, श्रीकांत भिडे व बंधू तसेच संस्कृती शिंदे उपस्थित होत्या. ताणतणाव मुक्ती कार्यशाळेत मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला उपस्थित कामगारवर्गाने प्रतिसाद दिला.
--
देवरूखला मंगळवारी मूर्तिकार स्नेहमेळावा

रत्नागिरी ः संगमेश्वर तालुका श्री गणेश मूर्तिकार संघटनेतर्फे मंगळवारी (ता. ३) जानेवारीला लक्ष्मी नृसिंह मंगल कार्यालय देवरूख येथे मूर्तिकारांमधील स्नेहभाव वृद्धिंगत व्हावा यासाठी मूर्तिकार स्नेहमेळावा सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेदिन या वेळेत आयोजित केला आहे. संघटना आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी यासाठी दिनदर्शिका प्रकाशन व मूर्तिकारांची कला विकसित व्हावी यासाठी माजी अध्यक्ष जिल्हा परिषद रत्नागिरी रोहन बने व संघटना पुरस्कृत जिल्हास्तरीय शाडूमाती गणेशमूर्ती प्रदर्शन स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. हे सर्व कार्यक्रम मूर्तिकारांसाठी आहेत. या कार्यक्रमानिमित्त भारत सरकार हस्तकला सेवाकेंद्रामार्फत मूर्तिकारांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यासाठी भारत सरकार हस्तकला ओळखपत्र मिळवणे आवश्यक आहे. या वेळी मूर्तिकारांना ओळखपत्राचे वाटप होणार आहे. या विषयासंदर्भात सविस्तर मार्गदर्शनासाठी भारत सरकार हस्तकला सेवाकेंद्र वस्त्र मंत्रालयाचे सहाय्यक निर्देशक चंद्रशेखर सिंग यांनी दिली असून, संघटनेने त्यांना निमंत्रित केले आहे. याचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील माझ्या सर्व मूर्तिकारानी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गणेश मूर्तिकार संघटना संगमेश्वर अध्यक्ष आत्माराम हुमणे यांनी केले आहे.
--

फोटो ओळी
-rat३१p१०.jpg ः
७२२६४
गुहागर ः गुहागर सरस महोत्सवाचे उद्घाटन करताना मान्यवर.
---
गुहागर सरस महोत्सवाचे उद्घाटन

गुहागर ः समाजव्यवस्था जर चांगल्या प्रकारची तयार करायची असेल तर महिला सक्षमीकरणाच्यादृष्टीने पाऊल पुढे टाकणे गरजेचे आहे असे मत नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुका अभियान कक्ष गुहागर आणि पंचायत समिती गुहागरमार्फत तालुक्यातील स्वयंसहाय्यता समुहातील महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांच्या विक्री व प्रदर्शनासाठी गुहागर सरस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हा महोत्सव तहसील कार्यालयामागे पोलिसपरेड मैदान येथे ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. महोत्सवात सद्गुरू कृपा, सावित्रीबाई फुले, श्री हरेश्वर, जयहनुमान, आदर्श महिला बचतगट अशा विविध बचत समुहांनी स्टॉल लावले आहेत. या प्रदर्शनामध्ये गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायती स्वयंसहाय्यता बचत समुहाचे एकूण २७ विविध प्रकारच्या उत्पादनांचे व १० जेवणाचे स्टॉल असे एकूण ३७ स्टॉल उपलब्ध आहेत.
-----
फोटो ओळी
-rat३१p१३.jpg-
७२२६७
गुहागर ः जानवळे सरपंचपदी जान्हवी शिरगावकर यांचे अभिनंदन करताना मान्यवर.
---
जानवळे सरपंचपदी जान्हवी शिरगावकर

गुहागर ः तालुक्यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या जानवळे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी गावदेवी विकास पॅनलच्या जान्हवी शिरगावकर यांनी तर उपसरपंचपदी मुबीन ठाकूर यांनी आपला पदभार स्वीकारला. सदस्य म्हणून प्रसन्न पाटील, मंगेश कोंडविलकर, वैभवी जानवळकर,विभावरी लांजेकर निवडून आले असून नव्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी आपला पदभार शुक्रवारी स्वीकारला. या वेळी माजी सरपंच नम्रता संसारे, माजी उपसरपंच किशोर कुलकर्णी, अंतिम संसारे, चेअरमन अनिल देवस्थळी, रूपेश नर्बेकर, प्रतिष्ठित नागरिक अनंत जाधव, राजेंद्र बेलवलकर, इसाक ठाकूर, मनसे तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर, मुख्याध्यापक रवींद्र इंदुलकर, गावकर मंगेश शितप आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
---