चिपळूण ः घाणेखुंट उपसरपंच निवडणुकीत ठाकरे सेनेची बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः  घाणेखुंट उपसरपंच निवडणुकीत ठाकरे सेनेची बाजी
चिपळूण ः घाणेखुंट उपसरपंच निवडणुकीत ठाकरे सेनेची बाजी

चिपळूण ः घाणेखुंट उपसरपंच निवडणुकीत ठाकरे सेनेची बाजी

sakal_logo
By

ratchl३११.jpg ः
७२२७०
चिपळूणः सरपंच, उसरपंच व सदस्यांचा झालेला सत्कार.
-------
घाणेखुंट जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्याची ग्वाही
उपरसपंच नजीर सुर्वे; सर्व पक्षांविरोधात ठाकरे सेनेची बाजी
चिपळूण, ता. ३१ ः खेड तालुक्यातील घाणेखुंट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्व राजकीय पक्ष विरोधात असताना शिवसेना ठाकरे गटाने बाजी मारली होती. सरपंचपदी तरुण राजू ठसाळे तब्बल ४०० मतांनी विजयी झाले तर उपसरपंचपदाच्या निवडणुकीतही ठाकरे सेनेने बाजी मारली. ठाकरे गटाचे उमेदवार नजीर सुर्वे यांना ११ पैकी ७ मिळाल्याने सुर्वेंची उपसरपंचदाची वर्णी लागली.
घाणेखुंट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधात सर्वपक्षीयांनी शड्डू ठोकला होता. मतदानापूर्वी लोकप्रतिनिधींनीही येथे तळ ठोकला होता. तरीही ठाकरे सेनेची मतदारांशी घट्ट नाळ जुळली असल्याने संतोष ठसाळे हे थेट जनतेतून ४०० मतांची आघाडी घेत विजयी झाले होते. त्यांच्यासोबत ६ सदस्य निवडून आले. त्यानंतर २९ ला उपसरपंचपदाची निवडणूक झाली. उपसरपंचपदासाठी ३ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील १ अर्ज मागे घेण्यात आला. २ उमेदवारांसाठी गुप्त पद्धतीने मतदान झाले. यामध्ये नजीर सुर्वे यांना ११ पैकी ७ मते मिळाली तर विरोधी उमेदवारास ४ मते मिळाली. निरीक्षक म्हणून विजय थोरे यांनी काम पाहिले.
सरपंच ठसाळे यांनी गेल्या काही वर्षापासून रोटरी आणि रोटरॅक्ट क्लबच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबवले आहेत. परिसरातील कंपन्यांच्या माध्यमातून गावात लोकोपयोगी कामे केली. लोकांना खोटी आश्वासने न देता होणारे काम करण्यावर भर दिला. शांत स्वभावाने ग्रामस्थांशी घट्ट नाळ जोडली. ग्रामस्थ कोणत्याही राजकीय विचारधारेचा असो त्यांच्या अडीअडचणीच्या प्रसंगात मदत करण्यावर आघाडी ठेवली. शिवसेना शाखा, गावातील विविध मंडळे, माजी सरपंच अंकुश काते तसेच गावातील तरुण-तरुणी आणि ज्येष्ठांचीही तितकीच दमदार साथ मिळाली. या सर्वांच्या बळावर ठसाळे यांनी तब्बल ४००चे मताधिक्य घेत विरोधकांवर मात केली. सरपंच ठसाळे यांनी सर्वसमावेशक काम करून लोकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याची ग्वाही दिली. उपरसपंच नजीर सुर्वे यांनी सर्व सदस्यांचे आभार मानत गावासाठी पारदर्शक काम करणार असल्याचे सांगितले. या वेळी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जल्लोष करत सरपंच, उपसरपंच व सदस्यांचे जंगी स्वरूपात अभिनंदन केले.