‘उडान’ महोत्सव नववर्षाची पर्वणी ः सुभाष पुराणिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘उडान’ महोत्सव नववर्षाची 
पर्वणी ः सुभाष पुराणिक
‘उडान’ महोत्सव नववर्षाची पर्वणी ः सुभाष पुराणिक

‘उडान’ महोत्सव नववर्षाची पर्वणी ः सुभाष पुराणिक

sakal_logo
By

72353
सावंतवाडी ः महोत्सवाचे उद्‍घाटन करताना सुभाष पुराणिक. शेजारी विनया बाड, राजन पोकळे, नारायण राणे, बाबू कुडतरकर आदी.

‘उडान’ महोत्सव नववर्षाची
पर्वणी ः सुभाष पुराणिक

सावंतवाडी येथे महोत्सवाचे उद्‍घाटन

सावंतवाडी, ता. ३१ ः नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जनता सज्ज झाली असताना सावंतवाडी शहरात उडान महोत्सव आयोजन करून जल्लोष निर्माण केला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी २० वर्षांपूर्वी सुरू केलेल्या सावंतवाडी पर्यटन महोत्सवानंतर महोत्सव सुरू झाले. शहरात आतापर्यंत झालेल्या महोत्सवांप्रमाणे ‘उडान’ महोत्सवही यशस्वी होईल, असा विश्वास सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक सुभाष पुराणिक व्यक्त केला.
शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत रोटरी क्लब आयोजित उडान महोत्सव उद्‍घाटन सामाजिक वनीकरणचे उपसंचालक पुराणिक यांच्या हस्ते काल (ता. ३०) सायंकाळी करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्षा विनया बाड, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, शहराध्यक्ष खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, अॅड. नीता कविटकर, आबा केसरकर, प्रसन्न शिरोडकर, अनारोजीन लोबो, अनघा रामाणे, प्रणय तेली, गोविंद वाडकर, राजू पनवेलकर आदी उपस्थित होते. माजी उपनगराध्यक्ष पोकळे यांनी वीस वर्षांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष दीपक केसरकर यांनी सुरू केलेल्या येथील पर्यटन महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर अनेक ठिकाणी महोत्सव यशस्वी झाले. या महोत्सवात नावीन्यपूर्णता ठेवून नवीन वर्षाचे स्वागत केले जाईल, असे सांगितले. अनारोजीन लोबो यांनी रोटरी क्लब आणि इनरव्हील क्लबच्या महोत्सवाने जनतेला नवीन वर्षाच्या स्वागताची पर्वणी मिळाल्याचे सांगितले. अॅड. नीता सावंत-कविटकर यांनी मार्गदर्शन केले. राजेश रेडीज यांनी रोटरी क्लबची ओळख करून दिली. रोटरी क्लब अध्यक्षा विनया बाड, बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख नारायण राणे यांनी शुभेच्छा दिल्या.