जाधव फिटनेस अॅकॅडमीतर्फे आज महिलांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाधव फिटनेस अॅकॅडमीतर्फे आज महिलांचा सन्मान
जाधव फिटनेस अॅकॅडमीतर्फे आज महिलांचा सन्मान

जाधव फिटनेस अॅकॅडमीतर्फे आज महिलांचा सन्मान

sakal_logo
By

जाधव फिटनेस अॅकॅडमीतर्फे
आज महिलांचा सन्मान
रत्नागिरी, ता. ३१ः जाधव फिटनेस अॅकॅडमीच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त रविवारी (ता. १ जानेवारी) विधवा व कष्टकरी महिलांचा सन्मान व मराठा श्री शरीर सौष्ठव स्पर्धा २०२३ चे आयोजन केले आहे. समाजात वेगवेगळ्या चालीरिती आहेत. काही चांगल्या तर काही विधातक आहेत. एक अघोरी अन्यायकारक प्रथा चालत आलेली आहे. ती समाजातून नष्ट होऊन अशा कष्टकरी स्त्रीयांवर होणारा अन्य बंद व्हावा व विधवा स्त्रीयांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळावे हा अॅकॅडमीचा उद्देश आहे. या कार्यक्रमात विधवांकडून जे अलंकार काढलेले असतात ते सन्मापूर्वक तिला घातले जाणार आहेत व विधवा भगिनींना हळदीकुंकू, भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
ज्या कष्टकरी महिला आपल्या कुटुंबाची जबाबदारी उचलत असतात अशा महिलांनापण भेटवस्तू देऊन सन्मानित केले जाणार आहे. याच दिवशी अॅकॅडमीतर्फे मराठा श्री शरीरसौष्ठव स्पर्धा २०२३ ही स्पर्धा सर्व समाजातील लोकांसाठी खुली असेल. मराठा श्री मर्यादित शरीरसौष्ठव स्पर्धा फक्त मराठा समाजासाठी असेल. या स्पर्धेला मराठा असल्याचा दाखला देणे आवश्यक आहे. दोन्ही स्पर्धा जिल्हा स्तरावरील असतील. मराठा श्री ओपन स्पर्धा चार गटात घेतली जाईल. मराठा श्री मर्यादित हि स्पर्धा दोन गटामध्ये घेतली जाईल. स्पर्धा सायंकाळी सहा वाजता सुरू होईल.