उद्योगमंत्री सामंतांची अधिवेशनात विक्रमी कामगिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्योगमंत्री सामंतांची अधिवेशनात विक्रमी कामगिरी
उद्योगमंत्री सामंतांची अधिवेशनात विक्रमी कामगिरी

उद्योगमंत्री सामंतांची अधिवेशनात विक्रमी कामगिरी

sakal_logo
By

rat३१३४.txt

(पान ३ साठी)

उद्योगमंत्री सामंतांची अधिवेशनात विक्रमी कामगिरी

रत्नागिरी, ता. ३१ ः महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ ते ३० डिसेंबर २०२२ दरम्यान नागपूर येथे झाले. या अधिवेशनात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लक्षवेधी विक्रमी कामगिरी केली. अधिवेशनात विधानसभेत १०६ तर विधानपरिषदेत ४३ लक्षवेधी मांडण्यात आल्या. यामध्ये सामंत यांनी विधानसभेत ३० लक्षवेधी तर विधानपरिषदेत ७ लक्षवेधींना उत्तरे दिले. श्री. सामंत यांची अधिवेशन काळामध्ये सभागृहातील उपस्थिती सर्वाधिक होती. सामंत यांनी लक्षवेधींना तर उत्तरे दिलीच त्याचप्रमाणे विधानसभा आणि विधानपरिषदेत अनुक्रमे ७ आणि ४ प्रश्नांना उत्तरे दिली. सामंत यांनी ट्विट करत आपल्या अधिवेशन काळातील कामगिरीबद्दल माहिती दिली आहे. विशेषतः सभागृहात कामकाजादरम्यान सहकार्य करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत.