
जांभवडेतील घर फोडून ६५ हजारांचा मुद्देमाल चोरीस
जांभवडेतील घर फोडून
६५ हजारांचा मुद्देमाल चोरीस
वैभववाडी, ता. ३१ ः जांभवडे-पालांडेवाडी येथील अनंत रामचंद्र राबांडे यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्याने तिजोरीतील ५० हजार रुपये रोख आणि अंगठीसह ६५ हजारांचा मुद्देमाल चोरला. हा प्रकार १२ नोव्हेंबर ते २७ डिसेंबर दरम्यान घडला. जांभवडे-पालांडेवाडी येथे राबांडे यांचे घर आहे. घराच्या एका बाजूला त्यांचे भाऊ राहतात. ते १२ नोव्हेंबरला बाजूचे दरवाजे बंद करून मुंबईला गेले. पुन्हा २७ डिसेंबरपर्यत गावी आले. त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळले. आतील दरवाजा आणि तिजोरीदेखील उघडलेली होती. तिजोरीतील ५० हजार रुपये आणि तीन ग्रॅम सोन्याची अंगठी नव्हती. यावेळी खिडकी देखील उघडल्याचे दिसून आले. यासंदर्भात त्यांनी येथील पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक अमित यादव, हवालदार सुनील पडेलकर यांनी घटनास्थळी पंचनामा केला.