
हर्णै ःमासळी बाजार पर्यटकांनी हाऊसफुल्ल
-rat३१p२३.jpg-
72346
हर्णै ः २०२२ ला निरोप देताना नव्या वर्षाचे स्वागतासाठी दापोली येथे आलेल्या पर्यटकांनी हर्णैमधील मासळी बाजारात खरेदीसाठी तुफान गर्दी केली होती. (राधेश लिंगायत ः सकाळ छायाचित्रसेवा)
-rat३१p२४.jpg-
72348
हर्णै ः मासळी बाजारात खरेदी करताना पर्यटक.
मासळी बाजार पर्यटकांनी हाऊसफुल्ल
हर्णै बंदरात आठवडाभर गर्दी; चिमणी बाजारातूनच खरेदी
हर्णै, ता. ३१ ः नाताळ आणि ‘थर्टी फर्स्ट’ला सलग शनिवारी (ता. ३१) आणि रविवारच्या (ता. १) आलेल्या सुटीमुळे दापोली तालुका पर्यटकांनी फुलून गेला आहे. तालुक्यातील हर्णै बंदरात पर्यटकांनी वर्षअखेरीच्या संध्येलाही मासळी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती. गेल्या दोन वर्षांच्या मानाने यावर्षी पर्यटकांच्या संख्येमध्ये हंगामाच्या सुरुवातीपासूनच वाढ झाली आहे. विकेंडलादेखील गर्दी होत आहे. त्याचे प्रत्यंतर मासळी बाजारात आले.
कोकणात विशेष करून विदर्भ, आंतरराष्ट्रीय, पश्चिम महाराष्ट्र, इतर परराज्यातील पर्यटक फिरायला जास्त प्रमाणात येऊ लागला आहे. २५ डिसेंबरपासून नाताळची सुट्टी आणि थर्टी फर्स्टला सलग लागून आलेला शनिवार, रविवार सुटीच्या निमित्ताने शुक्रवारपासूनच पर्यटक हजर झाले. स्पेशल थर्टी फर्स्टसाठी बीचवर मज्जा करण्यासाठी गर्दी केली आहे. दापोलीमध्ये आलेला पर्यटक हर्णै बंदरामध्ये आल्याशिवाय माघारी फिरत नाही. या सलग सुट्यांमुळे मासळी खरेदीसाठी आवर्जून येतातच. पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला मासळी खाण्याचा एक वेगळाच विलक्षण आनंद असतो. तालुक्यातील बहुतांश हॉटेल व रिसॉर्टना झिंगा फ्राय, पापलेट थाळी, सुरमई थाळी, कोळंबी बिर्याणी आदी मासळीच्या चटकदार मसालेदार डिशेस खाण्यासाठी पर्यटकांनी कोकणातील या मिनी महाबळेश्वरला पसंती दिली आहे. येथील निसर्गसौंदर्याची भुरळ पर्यटकांना पडतेच; परंतु कोकणी पद्धतीच्या घरगुती जेवणाची लज्जत ही वेगळीच असते. इथल्या ताज्या मिळणाऱ्या मासळीचे पर्यटकांना विशेष आकर्षण वाटते. त्यामुळे गेल्या शनिवारपासून (ता. २४) मासळी खाण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी पर्यटक हर्णै बंदरामध्ये आवर्जून हजेरी लावत आहेत.
-----------------------------------
चौकट
खरेदीसाठी पर्यटकांचीच संख्या जास्त
सध्या ताजे ताजे मासे चिमणी बाजारातूनच पर्यटक खरेदी करत आहेतच; परंतु याच चिमणी बाजारातून सुकी मासळीचीदेखील पर्यटकांकडून खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या शनिवारपासूनच सकाळ व सायंकाळी चिमणी बाजारामध्ये हर्णै बंदरात मासळी खरेदीसाठी पर्यटकांचीच संख्या जास्त होत असून, आज शनिवारी थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी मासळी खरेदीला पर्यटकांनी तुडुंब गर्दी केली होती.