
कृषी सदर
(सूचना ः डॉ. विलास सावंत यांचा फोटो, कृषी सदर फॉरमॅट ५ मे रोजी प्रसिद्ध टुडे चारवरून घ्या)
----
82013
बहुगुणी जांभूळ
लीड
आयुर्वेदानुसार जांभूळ फळामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. औषधी गुणधर्मामुळे जांभूळाचे अनेक फायदे आहेत. कोकणात जांभूळ देखील उन्हाळ्यात आंब्याच्या आगमानाच्यावेळी येते. आयुर्वेदात जांभूळ हे मधुमेह नियंत्रित करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या सोबतच अन्न पचनासाठी, दातांसाठी, डोळ्यांसाठी, पोटासाठी, चेहऱ्यासाठी, किडनी स्टोनसाठी जांभूळ फायदेशीर आहे. जांभूळामध्ये लोह, कॅल्शियम, प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट्स देखील असतात. त्यामुळे ते मुलांच्या आरोग्यासाठी देखील खूप चांगले आहे.
- - डॉ. विलास सावंत
------------
जांभळाचे शास्त्रीय नाव युजोनिआ जम्बोलीना आहे. कोकणात नैसर्गिकरित्या वाढलेली झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. या झाडांची शास्त्रीय पद्धतीने लागवड अत्यंत कमी प्रमाणात आहे. जांभळाच्या फळांचा रंग काळा-निळा असतो. झाडांचा रंग फिकट व भुरकट असतो. साल खडबडीत असते. जांभळाचे झाड ४० फुटांपासून ८० फुटांपर्यंत वाढते. चैत्र-वैशाखात जांभळाच्या झाडांना फळे येतात. जांभळाची पाने बकुळीच्या पानांसारखी असतात. पानांचा आकार लांबट असून ती जाड व सुंगंधी असतात. पानांपासून तेल काढले जाते ते सुगंधी असते. जांभळाची फुले पांढऱ्या रंगांची असून फार नाजूक असतात. फुलांचे गुच्छ पाहण्यास आकर्षक असतात. जांभळाची चव गोड, थोडीशी आंबट व तुरट असते. फळांचा रंग बाहेरून काळसर जांभळा व आतून लाल तांबूस असतो. फळांचा आकार गोलाकार किंवा लांबगोलाकार असतो. फळांपासून आस व सरबत बनवितात.
प्लीहा व यकृत विकार, पंडुरोग, मधुमेह व कावीळ यावर जांभळाचा औषधी उपयोग करतात. जांभळाच्या सेवनाने रक्त शुध्द व लाल होते. जांभूळ वीर्यवृद्धी करणारे आहे. जांभळामध्ये मोठ्या प्रमाणात ‘ब’ ‘क’ जीवनसत्वे, फॉलिक अॅसिड व कॉलीन देखील असते. जांभळाची पाने, फळे, बिया, मुळे आणि खोड असे सर्व अवयव औषधी असतात. जांभळाच्या बिया उगाळून घामोळ्यावर लावतात. हे फळ कफ, पित्त, दाह, वायू यांचा नाश करणारे आहे. जांभळाच्या पानांचे तेल औषधी असते. विंचू चावल्यास पानांचा रस काढून विंचू चावलेल्या जागी लावावे, त्याने वेदना व सूज कमी होते. खोडाचा उपयोग खास करून इमारतीसाठी व फर्निचर तयार करण्यासाठी व शेतीची अवजारे बनविण्यासाठी केला जातो. जांभळाच्या फुलांप्रमाणे फळेही नाजूक असतात. झाडावरून खाली पडताच ही फळे फुटतात, म्हणून झाडावर चढून झेल्याने ही फळे अलगद काढावी लागतात. जांभळे लाकडी पेटीत किंवा करंड्यात खालच्या बाजूला पाला, पाने घालून अलगद ठेवली जातात. मूळ भारतीय असलेला हा वृक्ष म्यानमार, श्रीलंका, मलेशिया ते थेट ऑस्ट्रेलिया खंडातही सापडतो. समुद्र सपाटीवर, नदीनाल्याचे काठ तसेच उत्तुंग पर्वतावर याचे वास्तव्य आढळते. नैसर्गिक लागवड बियांपासून होते तर संकरीत जातींची लागवड कलम पद्धतीने करतात. झाडाला उत्तम निचरा होणारी जमीन मानवते व ३०० इंचापर्यंत पर्जन्यमान चालते. झाडांची लागवड केल्यानंतर ७ ते १० वर्षांनंतर फळे येतात. या बहुगुणी वृक्षाची लागवड करून त्याचे संवर्धन मोठ्या प्रमाणात केल्यास अर्थप्राप्ती होऊन निसर्ग संर्वधन व निसर्गाचे संतुलन राखण्यास मदत होईल.
(लेखक कृषी विज्ञान केंद्र किर्लोसमध्ये शास्त्रज्ञ आहेत.)
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57065 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..