कुडाळ भाजपतर्फे सावंत कुटुंबीयास मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळ भाजपतर्फे
सावंत कुटुंबीयास मदत
कुडाळ भाजपतर्फे सावंत कुटुंबीयास मदत

कुडाळ भाजपतर्फे सावंत कुटुंबीयास मदत

sakal_logo
By

L२१००४


-पाट ः परबवाडा येथील प्रकाश सावंत यांच्या घरी भाजप नेते रणजित देसाई यांनी पाहणी करून मदत दिली.

कुडाळ भाजपतर्फे
सावंत कुटुंबीयास मदत
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ ः तालुक्यातील पाट-परबवाडा येथील प्रकाश सावंत यांच्या घराला आग लागून घरातील धान्य, कपडे, पैसे व साहित्य जळून खाक झाले. या घटनेमुळे सावंत कुटुंबीयांवर फार मोठे संकट कोसळले आहे. याची माहिती मिळताच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई, माजी सभापती संजय वेंगुर्लेकर, तेंडोली सरपंच भाऊ पोतकर, पिंगुळी शहराध्यक्ष अजय आकेरकर, माजी सरपंच समाधान परब, सतीश माड्ये, सतीश पाटकर, शंकर घारे व कार्यकर्त्यांनी सावंत कुटुंबीयांची भेट घेऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली व त्यांना धीर दिला. यावेळी घरातील भांडी, जीवनावश्यक वस्तू तसेच इलेक्ट्रिक मिक्सर इत्यादी तातडीची मदत देखील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. त्याचबरोबर तातडीने १००० मंगलोरी कौले व इतर साहित्य पाठवून देण्याचे आश्वासन दिले. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर ही गोष्ट घालून त्यांच्या माध्यमातून सावंत कुटुंबीयांना अन्य मदत करण्याची ग्वाही देखील सर्व पदाधिकाऱ्यांनी दिली. शासनाकडून मिळणारी मदत अत्यंत तुटपुंजी असल्याने या नुकसानग्रस्त घरासाठी वेगळे निकष लावून त्यांना भरीव मदत शासनाकडून देण्यात यावी, अशी मागणी देखील महसूल विभागाकडे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पाट-परबवाडा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
-------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57066 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top