फोटोसंक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोसंक्षिप्त
फोटोसंक्षिप्त

फोटोसंक्षिप्त

sakal_logo
By

L२१००८

- पाट ः जितेंद्र सावंत, राजन नाईक यांनी प्रकाश सावंत कुटुंबीयांची भेट घेऊन मदत दिली. (छायाचित्र ः अजय सावंत)

सावंत कुटुंबीयास
आर्थिक मदत
कुडाळ, ता. ११ ः तालुक्यातील पाट-परबवाडा येथील प्रकाश सावंत यांच्या घराला आग लागून घरातील धान्य, कपडे, पैसे व साहित्य जळून खाक झाले. या घटनेमुळे सावंत कुटुंबीयांवर फार मोठे संकट कोसळले आहे. याची माहिती कुडाळमधील मच्छी विक्रेते तथा सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र सावंत तसेच सामाजिक कार्यकर्ते राजन नाईक यांनी प्रकाश सावंत कुटुंबीयांची भेट घेतली व सांत्वन केले. त्याच बरोबर जितेंद्र सावंत यांच्या माध्यमातून सावंत कुटुंबीयांना आर्थिक सहकार्य म्हणून रोख रक्कम पंचवीस हजार तसेच जीवनावश्यक वस्तू सावंत कुटुंबीयांकडे सुपूर्द केले. मच्छी व्यवसायिक जितेंद्र सावंत यांच्या सहकार्याबद्दल प्रकाश सावंत कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी पाट गावचे सामाजिक कार्यकर्ते महेश वेळेकर, सागर माळकर, नागेश नाईक, एकनाथ माळकर, सचिन गडेकर, महेश शेलटे, मनोहर महाडेश्वर आणि पाट गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
-----------
L21006

- नांदगाव ः लाभार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना मान्यवर.

जिवनावश्यक वस्तूंचे
नांदगावात वाटप
नांदगाव ः पंचक्रोशीमध्ये नुकतेच गरीब, होतकरू लाभार्थ्यांना स्वराज्य ग्रुप सिंधुदुर्गतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ग्रुपच्या सदस्यांनी घरोघरी जाऊन किटचे वाटप केले. यावेळी स्वराज्य सिंधुदुर्ग गृपचे प्रसाद सुखटणकर, तोसिम नावलेकर, विनायक परब, परशुराम आलव, योगेश घाडीगांवकर, सामाजिक कार्यकर्ते पप्पी वायंगणकर, पांडुरंग मोरये आदी उपस्थित होते. यावेळी स्वराज्य ग्रुप सिंधुदुर्ग सामाजिक कार्य करत असल्याने त्यांचे कौतुक करण्यात आले.
------------


गहाळ झालेला
मोबाईल केला परत
नांदगाव,ः येथील श्री देव कोळंबा जत्रौत्सवावेळी एका महिला भाविकाचा महागडा मोबाईल पत्रकार संघाचे उपाध्यक्ष उत्तम सावंत यांना मिळाला. तो मोबाईल त्या महिलेस परत करण्यात आला. या प्रामाणिकपणाचे पत्रकार सावंत यांचे कौतुक करण्यात आले.
कोळंबा देवाच्या दर्शनासाठी भाविकांचा मोठा जनसागर लोटला होता; मात्र चोख नियोजनामुळे भाविकांची गैरसोय झाली नाही. याच गर्दीत काही वस्तू सापडल्यावर संपर्क कक्षाजवळ माहीती दिली जात होती. याच गर्दीत पत्रकार सावंत यांना एक मोबाईल मिळाला. यानंतर स्पिकरवरुन माहीती दिल्यावर महिलेने ओळख पटवून ताब्यात घेत आभार मानले.
-----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57067 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top