ग्रामस्थांच्या योगदानातून दारुममधील रस्ता पूर्णत्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामस्थांच्या योगदानातून 
दारुममधील रस्ता पूर्णत्वास
ग्रामस्थांच्या योगदानातून दारुममधील रस्ता पूर्णत्वास

ग्रामस्थांच्या योगदानातून दारुममधील रस्ता पूर्णत्वास

sakal_logo
By

L२१००१

ओळ - दारुम ः विकासवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे उद्घाटन रवींद्रनाथ तळेकर आणि मनोहर तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. (छायाचित्र ः एन. पावसकर)

ग्रामस्थांच्या योगदानातून
दारुममधील रस्ता पूर्णत्वास
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ११ ः कणकवली तालुक्यातील दारुम येथील विकासवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे उद्घाटन रवींद्रनाथ तळेकर आणि मनोहर तळेकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. गेली १५ वर्षे हा रस्ता पूर्णपणे बाद झाला होता. ग्रामस्थांच्या योगदानातून हा रस्ता पूर्णत्वास गेला आहे.
दारुम विकासवाडीकडे जाणारा रस्ता गेली अनेक वर्षे प्रलंबित होता. वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत होते. रस्त्यामुळे विकासवाडीमध्ये वाहतूक करणे कठिण झाले होते. यामुळे विकासवाडी ग्रामस्थ मंडळ, दारुमने पुढाकार घेऊन ग्रामस्थांच्या योगदानातून सुमारे अडीचशे मीटर रस्ता डांबरीकरण करून घेतला. विशेष म्हणजे शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षामुळे रखडलेल्या या रस्त्याचे विकासवाडी ग्रामस्थांनी सहयोग देऊन पक्का डांबरी रस्ता करून घेतला. यासाठी प्रवीण (बाबू) तळेकर, मनीष तळेकर यांच्या भरीव योगदानासह वाडीतील सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
विकासवाडी ग्रामस्थ मंडळाची सार्वजनिक पूजा यावेळी आयोजित केली होती. त्यासाठी मुंबईस्थित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यावेळी विकासवाडी ग्रामस्थ मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
...............

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57068 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top