विशाल कडणे यांचा ''भांडुप भूषण'' पुरस्काराने गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विशाल कडणे यांचा ''भांडुप भूषण'' पुरस्काराने गौरव
विशाल कडणे यांचा ''भांडुप भूषण'' पुरस्काराने गौरव

विशाल कडणे यांचा ''भांडुप भूषण'' पुरस्काराने गौरव

sakal_logo
By

L२१००२
टीपः swt११३.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - भांडुप ः विशाल कडणे यांना ''भांडुप भूषण २०२२'' पुरस्काराने गौरविण्यात आले.

विशाल कडणे यांचा ''भांडुप भूषण'' पुरस्काराने गौरव
''मुंबईचा ओक्सिमन'' ः दुसऱ्यांदा सन्मान; कोरोनाकाळातील कार्याची दखल
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ११ ः समाजसेवेत सातत्य आणि चिकाटी असली की, समाज आपोआपच आपल्याला गौरवतो. गेले एक दशक सातत्याने ज्या उच्चविद्याविभूषित तरुणाने समाजसेवेच्या माध्यमातून फक्त मुंबईच नाही, तर अखंड महाराष्ट्राला भुरळ घातली, त्या मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील ''मुंबईचा ओक्सिमन'' विशाल कडणे यांचा ''भांडुप भूषण'' पुरस्काराने सन्मान करण्यात आला. भांडुप येथे कोकण विकास आघाडीच्या कार्यक्रमात त्यांना गौरविण्यात आले. हा पुरस्कार दोनदा मिळविणारे ते पहिले मानकरी ठरले आहेत.
या कार्यक्रमास स्थानिक खासदार मनोज कोटक, आमदार आशिष शेलार, आमदार श्याम सावंत आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोविड काळामध्ये स्वखर्चाने स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांना मोफत ओक्सिजन पुरवण्याचे काम श्री. कडणे यांनी केले होते. मोफत मास्क, औषधे, धान्य इत्यादी साहित्य यथाशक्ती त्यांनी मोफत वाटले होते. त्यांच्या कार्याची ''लंडन बुक ऑफ रेकॉर्डस'' यांनी नोंद घेऊन विशेष सन्मान केला होता. लंडनच्या महापौरांनी श्री. कडणे यांचे स्वतः फोन करून कौतुक केले होते. ह्याच कार्याची दखल घेत भांडुपमधील कोकणवासीय चाकरमान्यांनी या सिंधुपुत्राचा सन्मान केला. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला भव्य कार्यक्रमात ''भांडुप भूषण'' सोहळ्याचे आयोजन केले होते; मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे विशाल यांना या कार्यक्रमास उपस्थित राहता आले नाही. आमदार श्याम सावंत यांच्या हस्ते त्यांनी हा पुरस्कार त्यांच्या निवासस्थानी स्वीकारला. श्री. कडणे ह्यांनी पुरस्काराचे श्रेय आपल्या पालकांना आणि हेल्थकेअर फ्रंट वर्कर्सना दिले. ''भांडुप भूषण'' हा पुरस्कार त्यांना २०१४ मध्येही मिळाला होता. दोनदा भांडुप भुषण पुरस्कार मिळवणारे ते पहिले भांडुपकर ठरले आहेत. या पुरस्कारामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
.................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57071 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top