संक्षिप्त-1 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त-1
संक्षिप्त-1

संक्षिप्त-1

sakal_logo
By

--------------------
भालावलवासीयांची एकजूट
कौतुकास्पद ः संजू परब
ओटवणे, ता. १२ ः ग्रामीण भागातील भालावलसारख्या छोट्याशा गावातील ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद आहे. या एकोप्यामध्येच गावाचा सर्वांगीण विकास आहे. त्यामुळे भालावलवासीयांनी आपली ही एकजूट कायम ठेवावी. तसेच या गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी भालावलवासीयांना दिली. भालावल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात संजू परब बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती विनायक दळवी, बांदा येथील समाजसेवक भाऊ वळंजू दीपिका परब, तलाठी नेत्रा सावंत, केंद्रप्रमुख सावंत, तांबोळी सरपंच अभिलाष देसाई, माजी सरपंच शिवराम सावंत, विलवडे माजी बाबल दळवी, सोनू दळवी, उपसरपंच बाबू दळवी, प्रदीप दळवी, भालावल सरपंच अश्विनी परब, उपसरपंच समीर परब, दाभिल पोलीस पाटील भिकाजी घाडी. शशिकांत गवस , कोनशी पोलीस पाटील कोनसकर शाळेच्या मुख्याध्यापिका नम्रता कोठावळे, आरोग्य सेवक आत्माराम गवस, केंद्रप्रमुख सौ सावंत आदी उपस्थित होते. यावेळी विनायक दळवी यांनी भालावल गावाच्या विविध उपक्रमांसाठी आपण यापूर्वी मदतीचा हात दिला असून, यापुढेही सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. दीपिका परब यांनी मालावलवासीय या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकाच व्यासपीठावर आल्याबद्दल कौतुक करीत गावातील विधायक उपक्रमांसाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले यावेळी नेत्रा सावंत यांनी महसूल विषयक कामकाजासाठी ग्रामस्थांच्या सेवेसाठी आपण नेहमी तत्पर असून आपल्याला केव्हाही हाक हाक मारा सहकार्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याची ग्वाही भालावलवासियांना दिली. यावेळी अश्विनी परब यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भालावल परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचालन भदी हेवाळकर तर प्रास्ताविक व आभार उदय परब यांनी मानले. यावेळी देवस्थान कमिटी अध्यक्ष अशोक परब, देवस्थानचे मानकरी राजाराम परब, वसंत परब, विनायक परब, मुंबई मंडळाचे अध्यक्ष यशवंत देसाई, भरत परब, विजय परब, श्रीधर परब, वामन परब, रवींद्र गावडे, हेमंत गावडे, जनार्दन गावडे, आत्माराम परब, प्रसाद गोवेकर, गोपी परब, रमेश परब, आबा देसाई, सूर्याजी देसाई, प्रशांत मेस्त्री उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57072 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top