
टुडे पान तीन मेन-अर्चना फाउंडेशनतर्फे ''आधार अभियान''
L२१००५
- अर्चना घारे-परब
अर्चना फाउंडेशनतर्फे ''आधार अभियान''
अर्चना घारे-परब ः शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचविणार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ ः डोंगरदऱ्यांनी व्यापलेल्या सोयीसुविधांचा अभाव असलेल्या सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले या तालुक्यांमध्ये अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून आधार अभियान राबविण्यात येणार आहे. आजपासून (ता. ११) दोडामार्ग येथून या अभियानास प्रारंभ झाला आहे. राज्य व केंद्राच्या विविध लोककल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात, गरजूंना या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष अर्चना घारे-परब यांनी दिली.
सौ. घारे- परब म्हणाल्या, "कमी लोकसंख्येची छोटी-छोटी गावे डोंगरांच्या कुशीत विसावलेली आहेत. डोंगरी भाग असल्यामुळे या भागात उत्पन्नाची साधने देखील कमी आहेत. उद्योग-व्यवसाय कमी असल्यामुळे प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल, याची शाश्वती नाही. अशावेळी नागरिकांसाठी शासकीय योजना लाभदायी ठरतात. केंद्र आणि राज्याने विविध जनकल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. त्य़ांचा लाभ घेतल्यास जगणे सुसह्य होऊ शकते; परंतु अनेकांना शासकीय योजनांची माहिती नसते. लोकांना शासकीय योजनांची माहिती मिळावी, त्यांना योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी अर्चना फाउंडेशनने हा लोककल्याणकारी उपक्रम हाती घेतला आहे
आधार अभियान तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. यासाठी सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले या तिन्ही तालुक्यांमध्ये फाउंडेशनने मदत केंद्रे सुरू केली आहेत. यात पहिला टप्पा ११ ते १५ मे-दोडामार्ग केंद्र, दुसरा टप्पा १६ ते २२ मे-वेंगुर्ले केंद्र आणि तिसरा टप्पा २३ ते ३१ मे-सावंतवाडी केंद्र अशा प्रकारे आधार अभियान राबविण्यात येणार आहे. समाजातील निराधार, वृध्द व्यक्ती, अंध, अपंग, निराधार विधवा, परित्यक्ता, देवदासी महिला, अनाथ बालके इत्यादींचे जीवनमान सुसह्य करण्यासाठी शासकीय योजना फायदेशीर ठरत आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी शासन विविध विभागांमार्फत योजना राबवित असते. जसे व्यावसायिक विभाग, शैक्षणिक आरोग्य, सामाजिक विकास, महिला सक्षमीकरण व कौशल्य विकास, बाल विकास, सामूहिक विकास, कृषी विकास, ग्रामीण विकास, वैयक्तिक लाभ, भूमी अभिलेख, पशुसंवर्धन, क्रीडा विषयक व इतरही अनेक लोककल्याणकारी योजना आखल्या गेल्या आहेत; परंतु सर्वसाधारणपणे असे लक्षात येते की, या योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. यामुळे लोकांपर्यत माहिती पोचण्यासाठी अर्चना फाउंडेशनने एक माहितीपत्रक तयार केले आहे. त्यामध्ये आठ महत्त्वाच्या योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यात पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, आयुष्यमान भारत योजना, ई-श्रम कार्ड योजना, सुकन्या समृद्धी योजना, पंतप्रधान किसान योजना केवायसी तसेच नवीन आधारकार्ड काढणे व दुरुस्ती करणे, नवीन मतदान ओळखपत्र काढणे व दुरुस्ती करणे, नवीन पॅनकार्ड काढणे व दुरुस्ती करणे अशा योजनांचा समावेश आहे. ही पुस्तिका घरोघरी पोहोचविण्यात येणार आहे. नागरिकांनी अर्चना फाउंडेशनने सुरू केलेल्या आपल्या नजीकच्या मदत केंद्रावर जाऊन योजनांची माहिती व लाभ घ्यावा, असे आवाहन अर्चना घारे यांनी केले आहे.
................
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57075 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..