संक्षिप्त-2 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त-2
संक्षिप्त-2

संक्षिप्त-2

sakal_logo
By

तळगाव सोसायटी अध्यक्षपदी पावसकर
कुडाळ ः तळगाव (ता. मालवण) येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित, तळगाव संस्थेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत प्रकाश पावसकर यांची अध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी तेरा पैकी सात मते मिळविली. उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होऊन सर्व संचालक मंडळाच्यावतीने राजेंद्र दळवी यांची निवड केली. संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यानुसार संस्था कार्यालयात ५ मे रोजी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. ढवण यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांकरिता निवडणूक घेण्यात आली. यावेळी संस्था संचालक सूर्यकांत दाभोलकर, दिलीप दळवी, प्रशांत दळवी, वासुदेव दळवी, प्रवीण जावकर, महेश परब, नरेंद्र पाताडे, सौ. समृद्धी कुशे, सौ. वर्षा वाळके, कृष्णा पाताडे, चेतन मुसळे व अजिंक्य पाताडे, प्रसाद मोरजकर, सागर कुशे, भाई राणे, महेश परब व संस्था सचिव तळगावकर उपस्थित होते. श्री. पावसकर यांनी मत व्यक्त करताना सांगितले की, संस्थेच्या उर्जितावस्थेसाठी प्रामाणिक प्रयत्न राहणार आहेत. सभासद व शेतकरी यांच्यासाठी पूरक योजना, विकासात्मक कार्यपद्धती याचा वापर करून संस्थेच्या विकास दरात भर घालण्यात येईल.
-------------
तळवडेमध्ये पारितोषिक वितरण
सावंतवाडी ः तळवडे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विष्णू पेडणेकर, सौ. सुलोचना कुलकर्णी, चॅरिटेबल ट्रस्ट कार्यवाह अनिल कुलकर्णी, सदस्य अजित कुलकर्णी, मदन काष्टे, सौ. मंजिरी काष्टे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक विद्याधर परब, मानव विकास संसाधन संस्था परिवर्तन केंद्रप्रमुख विलास हडकर, माजी मुख्याध्यापिका विदुल पाटकर, मळेवाड विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक जगदीश तिरपुडे, संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पेडणेकर, खजिनदार डॉ. भालचंद्र कांडरकर, संचालक अशोक वराडकर, सुरेश गावडे, विद्यालयाचे प्राचार्य प्रतापराव देसाई, पर्यवक्षक दयानंद बांगर, ज्येष्ठ शिक्षिका अश्विनी कुलकर्णी, राजाराम वागतकर आदी उपस्थित होते. यावेळी अनिल कुलकर्णी यांच्या हस्ते सौ. सुलोचना कुलकर्णी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विद्यालयांमध्ये उभारण्यात आलेल्या संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. मदन काष्टे यांच्या देणगीतून बांधलेल्या सभागृहाचे उद्घाटन मदन काष्टे व सौ. मंजिरी काष्टे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक सौ. कुलकर्णी, सूत्रसंचालन सौ. चव्हाण, आभार श्री. बांगर यांनी मानले.
--------------
कणकवलीत डांबरीकरणाची मागणी
कणकवली ः येथील बस स्थानकासह आगारातील डांबरीकरण गेल्या काही वर्षांत उखडून गेले आहे. जोराच्या वार्‍यामुळे उधळणारी धूळ स्थानकांतील प्रवाशांच्या नाकातोंडात जात असल्याने ते हैराण होत आहेत. धुळीच्या या साम्राज्यामुळे स्थानकातील वाहतूक नियंत्रण कक्षासह सर्वं दुकानांमध्ये मातीचे थर जमा झाले आहेत. जिल्ह्यातील बहुतांशी बसस्थानके व आगारात हीच स्थिती असून येथे डांबरीकरण करावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. बसस्थानकांवरील डांबरीकरण जाऊन मातीचा थर वर आला आहे. जोराचा वारा तसेच गाड्या बस स्थानकात ये-जा करीत असताना पाठीमागून मातीची धूळ स्थानक परिसरासह प्रवाशांच्या नाकातोंडात जाते. परिणामी, प्रवासी हैराण झाले आहेत. स्थानकांतील सर्व दुकानांमध्ये ही धूळ पसरत असल्याने दुकानांतील वस्तू मातीने माखल्या जात आहेत. नियंत्रण कक्षातील कर्मचारीही हैराण झाले आहेत. त्यामुळे या भागाचे तातडीने डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57077 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top