संगमेश्वर-कोकणातील चित्रकारांचा कलाविष्कार कोल्हापुरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संगमेश्वर-कोकणातील चित्रकारांचा कलाविष्कार कोल्हापुरात
संगमेश्वर-कोकणातील चित्रकारांचा कलाविष्कार कोल्हापुरात

संगमेश्वर-कोकणातील चित्रकारांचा कलाविष्कार कोल्हापुरात

sakal_logo
By

-rat11p4.jpg
21024
- संगमेश्वर ः निसर्गाचे रुप दाखविणारे चित्र.
..
-rat11p5.jpg
21025
- ग्रामीण भागातील खेड्याचे चित्र.
-----------
कोकणातील चित्रकारांचे कोल्हापुरात कलाप्रदर्शन

सराय गॅलरीत चित्रप्रदर्शन; १३ ला उदघाटन, रेहा राजेशिर्के हिच्या कलाकृतींचे आकर्षण
सकाळ वृतसेवा
संगमेश्वर, ता. ११ ः कोकणातील कलाकारांच्या कुंचल्यातून नेहमीच येथील सर्वांगसुंदर निसर्गाचे दर्शन होत असते. कोकणचे ग्रामीण जीवन, जुन्या वास्तू, नद्या-नाले कोकणातील चित्रकारांना खुणावत असतात. चित्राकृतीतून बोलणारा निसर्ग कलानगरी म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूरकरांच्या भेटीसाठी सहा चित्रकारांच्या माध्यमातून१३ मेपासून येत आहे. यामध्ये खास वैशिष्ट्य आहे, ते ९ वर्षीय बालकलाकार रेहा राजेशिर्के हिच्या कलाकृतींचे.
कोकणातील ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के हे कलाचळवळीतील मोठे नाव. गेले काही दिवस त्यांच्या मनात कोकणातील काही कलाकारांच्या कलाकृतींचे कलानगरी असणाऱ्या कोल्हापूरमधील ''सराय'' गॅलरीत प्रदर्शन भरविण्याचे ठरत होते. राजेशिर्के यांनी स्वतः पुढाकार घेऊन सहा कलाकारांची निवड केली आणि कोल्हापूरची सराय गॅलरी भाड्याने घेऊन १३ मे ही प्रदर्शनाची तारीख पक्की केली. १३ ते १८ मे असे सहा दिवस सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन १३ मे रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे.
उर्वरीत कलाकारांमध्ये निसर्गा जवळ आपला कुंचला आणि रंगांच्या माध्यमातून नियमित संवाद साधणारे निसर्ग चित्रकार विष्णू परीट, प्रणय फराटे, प्रकाश महिनकर, संकेत कदम, दिगंबर मांडवकर यांच्या कलाकृतींचा समावेश आहे. विष्णू परीट यांचे जलरंगावर कमालीचे प्रभुत्व आहे. प्रणय फराटे हा युवा कलाकार सह्याद्री कलामहाविद्यालय सावर्डे येथे रंग आणि रेखाकलेचे शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत असून त्याच्या बोटात तर निसर्गदत्त जादू भरली आहे.
अनेक नामवंत कलाकारांच्या पंढरीत कोकणातील सहा कलाकार आपला कलाविष्कार प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखविणार आहेत. याची कलारसिकांना मोठी उत्सुकता आहे. सकाळी ११ ते ८ वाजेपर्यंत हे चित्रप्रदर्शन रसिकांसाठी निःशुल्क पाहता येणार आहे. रसिकांना ज्या कलाकृती आवडतील, त्या खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. कोल्हापूरमधील कलारसिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के यांनी केले आहे.
-----------
चौकट
रेहा ही प्रकाश राजेशिर्के यांची नात
या कला प्रदर्शनात खास आकर्षण असणार आहे, ते ९ वर्षांच्या रेहा राजेशिर्के या बालकलाकाराच्या कलाकृतींचे. रेहा ही प्रकाश राजेशिर्के यांची नात असून बालपणापासून तिच्या अवतीभोवती चित्र आणि शिल्प पाहायला मिळाल्यामुळे तिला कलेची ईश्वरी देणगी प्राप्त झाली आहे. बाल कलाकाराच्या अंतर्मनाचा वेध घेणाऱ्या रेहाच्या कलाकृती रसिकांना भुरळ घालणाऱ्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57083 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top