
संक्षिप्त
-rat11p3.jpg
21023ः भैरीभवानी माता
---------------
शृंगारपूरला भैरीभवानी मंदिरात
वैशाख पौर्णिमा उत्सव
चिपळूण : श्री भैरीभवानी प्रचितगड सेवा संस्थान शृंगारपूर (ता. संगमेश्वर) या संस्थानच्यावतीने दरवर्षी भैरीभवानी मंदिरात वैशाख पौर्णिमा उत्सव सोहळा १५ व १६ मे रोजी शृंगारपूर येथे होणार आहे. यामध्ये सर्व देवांना अभिषेक, षोड्शोपचार पूजा, गणेशपूजन, नांदी श्राद्ध, पुण्याहवाचन, ब्रह्मांडीमंडळ, देवतास्थापना, देवीस्थापना, पाठांचे पठण, ग्रहस्थापना, अग्नीस्थापना, कुमारिका पूजन व सुवासिनी पूजन, ग्रह यज्ञाने हवन, सप्तशतीपाठाचे हवन, पूर्णाहूती व अखेर देवीचा गोंधळ दोन्ही दिवस दुपारी महाआरती तसेच दुपारी व रात्री श्रीक्षेत्र शृंगारपूर पीठात भाविकांसाठी कार्यक्रमाप्रित्यर्थ सेवार्थ चहा, अल्पोपाहार, भोजन व्यवस्था केलेली आहे. सर्व भाविकांनी सहकुटुंब, मित्रपरिवार उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र सुर्वे यांनी श्री भैरीभवानी प्रचितगड सेवा संस्थानच्यावतीने केले आहे.
-------------
साईबाबा मंदिराचा उद्घाटन सोहळा
लांजा ः तालुक्यातील वेरळ येथील श्री साईबाबा मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने बांधण्यात आलेल्या श्री साईबाबा मंदिराचा उद्घाटन सोहळा १९ आणि २० मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रमांतर्गत १९ मे रोजी सायंकाळी चार ते सात श्री साईबाबा मूर्ती व कळस यांची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. २० मे रोजी सकाळी ८ वा. देवतांचे नारळ ठेवणे, ९ वा. पुण्याहवाचन, १० वा. साईंचा जलाधिवास, ११ वा. पूर्णाहूती त्यानंतर ११. ३० मिनिटांनी श्री साईंची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. दुपारी १२ वा. प. पू. सचितानंद अभिनव विद्या नरसिंहभारती स्वामीजी संकेश्वर यांच्या हस्ते श्री कलशारोहण आणि ध्वजस्थापना होणार आहे. दुपारी १२ ते १ महाआरती, त्यानंतर साईभंडारा. सायंकाळी पाच ते सहा हळदीकुंकू, ७ ते ८ भजन, आठ ते साडेनऊ मान्यवर, देणगीदार यांचा सत्कार, रात्री ९. ३० वा. कुमार भाटे देवरूख यांचे कीर्तन असे कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमांचा भाविकांनी, साईभक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री साईबाबा मंदिर जीर्णोद्धार समिती वेरळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
----------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57086 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..