राजापूर-शीळमधील क्रिकेट स्पर्धेत शिवांश स्पोर्टस संघ विजेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-शीळमधील क्रिकेट स्पर्धेत शिवांश स्पोर्टस संघ विजेता
राजापूर-शीळमधील क्रिकेट स्पर्धेत शिवांश स्पोर्टस संघ विजेता

राजापूर-शीळमधील क्रिकेट स्पर्धेत शिवांश स्पोर्टस संघ विजेता

sakal_logo
By

-rat11p6.jpg
L21034
-राजापूर ः विजेत्या संघाला चषक देवून गौरविताना राजापूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे.
--------------
शीळमधील क्रिकेट स्पर्धेत
शिवांश स्पोर्टस संघ विजेता
राजापूर, ता. ११ ः शहरानजीकच्या शीळ येथील सर्वोदय प्रतिष्ठान, साई नलवाई क्रिकेट संघ आणि एन.सी.सी शिळ यांच्यातर्फे आयोजित खुल्या क्रिकेट स्पर्धेचे शिवांश स्पोर्टस् संघाने अंतिम सामन्यामध्ये केएम फायटर संघाला पराभूत करीत विजेतेपद पटकाविले. विजेत्या शिवांश स्पोटस् संघाला 50 हजार रुपये चषक देऊन गौरविण्यात आले.
बक्षीस समारंभाला सर्वोदय प्रतिष्ठानचे अध्यक्ष वासुदेव गोंडाळ, राजापूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, सरपंच अशोक पेडणेकर, माजी सरपंच मधुकर सावंत, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा नागरेकर आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीततेसाठी अनिल मोंडे, विलास गोंडाळ, महेंद्र गोंडाळ, अजय मोंडे, प्रभाकर नागरेकर, प्रशांत नागरेकर, महेश गोंडाळ, प्रदीप गोंडाळ, कमलाकर गोंडाळ, अरविंद मोंडे, संदीप गोंडाळ, शैलेश बाईत यांच्यासह सर्वोदय प्रतिष्ठान, एनसीसी शीळ, साई नवलाई क्रिकेट संघाचे पदाधिकारी, क्रिकेटपटू, कार्यकर्ते आदींनी मेहनत घेतली.
..
चौकट
प्रथमेश ठाकरे ठरला मालिकावीर
स्पर्धेमध्ये वैयक्तिक लक्षवेधी कामगिरी करणारे रोशन मांजरे (उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक), सचिन शिवणेकर (फलंदाज), अक्षय कासार (गोलंदाज), संकेत शिवणेकर (यष्टीरक्षक), प्रथमेश ठाकरे (मालिकावीर) यांना गौरविण्यात आले. मैदानाबाहेर यशस्वीरित्या झेल पकडणारे मिहीर बाईत, हर्षल शिवगण, प्रतीक सौंदळकर या प्रेक्षकांनाही बक्षीस देवून गौरविण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57088 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top