
मंडणगड ः सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी संदीप सोंडकर
-rat11p13.jpg
21051
ः कादवण ः नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे अभिनंदन करताना सचिव दिनकर कदम.
--------------
लाटवण सहकारी संस्थेच्या
अध्यक्षपदी संदीप सोंडकर
मंडणगड, ता. ११ ः कादवण-लाटवण पंचक्रोशी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नवीन संचालक मंडळाची निवड घोषित करण्यात आली आहे. आगामी पाच वर्षांच्या कालावधीसाठी नवीन संचालक मंडळ कार्यरत राहणार आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी संदीप सोंडकर, तर उपाध्यक्षपदी रेश्मा जुवले यांची निवड झाली आहे. संस्थेच्या संचालकपदी आत्माराम सुतार, सुरेश सोंडकर, शरद कदम, प्रदीप गणवे, विनोद खैरे, बशीरअली उपाध्ये, योगेश होडबे यांची निवड झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व नवीन संचालक मंडळाचे निवडणूक निर्णय अधिकारी शामल क्षीरसागर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील मोरे, सचिव दिनकर कदम, मन्सूर जुवले, लियाकत मुंगरुस्कर यांनी अभिनंदन केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57094 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..