
पाट हायस्कूलमध्ये गतस्मृतींना उजाळा
L२१०४९
पाट ः येथील हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पार पडला.
पाट हायस्कूलमध्ये गतस्मृतींना उजाळा
माजी विद्यार्थी मेळावा ः तब्बल ४६ वर्षांनी जमले वर्गमित्र
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ ः पाट हायस्कूलच्या १९७६ च्या माजी विद्यार्थ्यांनी हायस्कूलमध्ये स्नेहमेळावा आयोजित केला होता. यावेळी त्यांनी तब्बल ४६ वर्षांनी शाळेतील आठवणी जागविल्या.
विविध क्षेत्रात विविध ठिकाणी विखुरलेल्या शाळेच्या १९७६ च्या बॅचला एकत्र करण्याचे काम उदय फणसेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. हा स्नेहमेळावा पाट हायस्कूलमध्ये झाला. त्यावेळचे शिक्षक श्री. फणसेकर, दिगंबर सामंत. सौ. सामंत, सौ. चित्रा सामंत, सुहास देसाई इत्यादी उपस्थित होते. यावेळी माजी विद्यार्थ्य़ांनी शाळेच्या काळातील आठवणी जागविल्या. प्रत्येकाने सध्या कार्यरत असलेले क्षेत्र आणि त्याचे ठिकाण अशी थोडक्यात ओळख करून दिली. पाट हायस्कूलमधील विविध उपक्रम जाणून घेतले. हायस्कूल परिसराचीही पाहणी केली. आपल्या जुन्या वर्गाचा आनंद घेतला. पाट हायस्कूलच्या कलादालनात कलाविषयक चाललेले विविध उपक्रम कलाशिक्षक संदीप साळसकर यांच्याकडून जाणून घेतले. यावेळी सुरू असलेल्या पखवाज वर्ग, हार्मोनियम वर्ग यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. गौरांग गोसावी, समीक्षा तेजम यांनी गीते सादर केली. यावेळी मुख्याध्यापक शामराव कोरे, पर्यवेक्षक राजन हंजनकर उपस्थित होते. एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाटच्यावतीने दिगंबर सामंत आणि सुधीर ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. तर श्री. फणसेकर, श्री. देसाई आणि सौ. सामंत यांनी शिक्षकांच्यावतीने आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी १९७६ च्या माजी विद्यार्थ्यांकडून ७६ हजार रुपयांची देणगी विद्यालयाला भेट देण्यात आली.
.................
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57104 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..