टुडे पान एक-सावंतवाडीत एसटी फेऱ्या रुळावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे पान एक-सावंतवाडीत एसटी फेऱ्या रुळावर
टुडे पान एक-सावंतवाडीत एसटी फेऱ्या रुळावर

टुडे पान एक-सावंतवाडीत एसटी फेऱ्या रुळावर

sakal_logo
By

21062
सावंतवाडी ः येथील आगारातून लांब पल्ल्याच्या एसटीला प्रवाशांचा प्रतिसाद लाभत आहे. (छायाचित्र ः रोहन गावडे)

सावंतवाडीत एसटी फेऱ्या रुळावर

संपानंतरची स्थिती; आगारातून ५२० फेऱ्या, रोज सात लाखाचे उत्पन्न

रोहन गावडे ः सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः संप मिटल्यानंतर तालुक्यात एसटी हळूहळू रुळावर येऊ लागली आहे. आता येथील आगाराकडून सर्व फेऱ्या सुरू केल्या आहेत. या फेऱ्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, प्रतिदिनी सुमारे सात लाख उत्पन्नापर्यंत येथील आगार पोचले आहे. सध्या येथील आगारातून लोकलच्या एकूण ५२० फेऱ्या सुरू असल्याची माहिती आगार प्रमुख नरेंद्र बोधे यांनी दिली.
गेली दोन वर्षे एसटी महामंडळ आर्थिक नुकसानीचे झटके सोसतच आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे प्रवाशांअभावी महामंडळाला नुकसानीचे चटके सोसावे लागले. ही परिस्थिती पूर्वपदावर येत असताना महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी प्रमुख मागण्यांसाठी संप पुकारला. यात हळुवार सुरू होत असलेली एसटीसेवा पार कोलमडली. यामुळे एसटीची चाके एकाच ठिकाणी रुतून राहिली. परिणामी महामंडळाचे एकूण उत्पन्न शून्यावर येऊन पोचले होते. यानंतर हा संप थोडा-फार चिघळला. पहिल्या टप्प्यात काही वाहक-चालक हजार झाल्याने काही बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या. यानंतर तब्बल सहा महिन्यांनी संप मिटवल्यानंतर एकूणच एसटी महामंडळाचे सर्व कर्मचारी कामावर हजार झाले. आता एसटीच्या सर्व फेऱ्या सुरू झाल्या आहेत. लांब पल्ल्याच्या फेऱ्यांसह लोकल फेऱ्या देखील सुरू केल्या आहेत. याला प्रवाशांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लोकल आणि लांब पल्ल्याच्या फेऱ्या मिळून एकूण सात लाखाचे उत्पन्न सध्या एसटी प्रशासनाला प्रतिदिनी उपलब्ध होत आहे. शाळांना सुटी असल्याने शाळेच्या तीस फेऱ्या बंद केल्या आहेत. शाळा सुरू होताच उत्पन्नात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. शाळा सुरू झाल्यानंतर त्या बसेस सुरू करण्यात येणार असल्याचे आगार व्यवस्थापकांनी सांगितले.
----
पॉईंटर
लांब पल्ल्याच्या फेऱ्यांच्या वेळा
१) पुणे शिवशाही ः सकाळी ८.३० सायंकाळी ६.४५, साधी सकाळी ७.१५
२) रत्नागिरी- सकाळी ७.३०, १०.४५, दुपारी १.०० व २.३०
३) कोल्हापूर आंबोली मार्गे तुळजापूर ः सकाळी ९.००
४) इचलकरंजी ः दुपारी १२.३०, नरसिंहवाडी-दुपारी १.४५
५) कोल्हापूर ः सकाळी ८.००, १०.३०, दुपारी २.४५
६) देवरुख ः दुपारी १२.३०
७) बेळगाव ः सकाळी ८.००, दुपारी १.००, सायंकाळी ६.००
८) गणपतीपुळे ः सकाळी ८.
९) सुटीनिमित्त रत्नागिरी-सकाळी ५.३०, बोरिवली-दुपारी ३.००, पुणे १०
-------------
चौकट
व्यावसायिकांना दिलासा
एसटी महामंडळाची चाके एकाच ठिकाणी रुतून राहताच याचा परिणाम संपूर्ण बाजारपेठेवर झालेला पाहावयास मिळाला. ग्रामीण भागातील लोकांचा एसटीअभावी शहराशी संपर्क तुटल्याने बाजारपेठा देखील मंदावल्या होत्या. एसटी स्थानकातील वेगवेगळी दुकाने, रिक्षा चालक तसेच धंदे देखील पूर्णतः डबघाईला गेले होते; मात्र आता एसटी सेवा पूर्ववत झाल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.
.................
कोट
लोकलच्या एकूण ५२० फेऱ्या सुरू केल्या आहेत. लोकल व लांब पल्ल्याच्या फेऱ्या, असे मिळून एकूण प्रतिदिनी सात लाखाचे उत्पन्न आगाराला प्राप्त होत आहे. तर दोन दिवसांत बेळगाव, रत्नागिरी, कोल्हापूरच्या फेऱ्या वाढविण्याचे नियोजन आहे. प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा.
- नरेंद्र बोधे, आगार प्रमुख, सावंतवाडी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57106 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top