माधवबागतर्फे शुक्रवारपासून आरोग्‍य तपासणी शिबिरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माधवबागतर्फे शुक्रवारपासून
आरोग्‍य तपासणी शिबिरे
माधवबागतर्फे शुक्रवारपासून आरोग्‍य तपासणी शिबिरे

माधवबागतर्फे शुक्रवारपासून आरोग्‍य तपासणी शिबिरे

sakal_logo
By

माधवबागतर्फे शुक्रवारपासून
आरोग्‍य तपासणी शिबिरे
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ११ ः माधवबागच्यावतीने १३ ते १७ मे या कालावधीत कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी येथील केंद्रांमध्ये आरोग्‍य तपासणी शिबिर होणार आहे. यात हृदयरोग, ब्लॉकेजेस, मधुमेह, रक्‍तदाब, लठ्ठपणा, स्ट्रेस, कोलस्ट्रेरॉल आदींची प्रमुख तपासणी होणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हे शिबिर होणार असल्‍याची माहिती माधवबागतर्फे देण्यात आली.
अँजिओग्राफी, अँजियोप्लास्टी, बायपासचा सल्‍ला मिळालेल्‍या किंवा शस्त्रक्रिया झालेल्‍या व्यक्‍ती, हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्‍या तसेच मधुमेह, अतिरक्‍तदाब, दम लागणे, छातीत दुखणे, पायाला सूज असणे आदी लक्षणे असलेल्‍या व्यक्‍तींसाठी या शिबिरात मार्गदर्शन आणि तपासणी होणार आहे. याशिवाय हृदय तपासणी, हृदयाचे ठोके तपासणी, रक्‍तदाब, रक्‍तातील ऑक्‍सिजन प्रमाण तपासणी, ईसीजी, रॅन्डम शुगर, हृदयाची कार्यक्षमता आदी तपासण्या होणार असून, या सर्व आजार किंवा आजारांच्या पूर्वलक्षणांबाबत तज्‍ज्ञ डॉक्‍टरांकडून मार्गदर्शन होणार आहे. इच्छुक रुग्‍णांनी १३ ते १७ मे या कालावधीत कणकवली, सावंतवाडी आणि कुडाळ येथील केंद्रांमध्ये होणाऱ्या आरोग्‍य शिबिराला उपस्थित राहाण्याचे आवाहन माधवबागतर्फे करण्यात आली आहे.
..................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57108 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top