माजी विद्यार्थी मेळावा सावंतवाडीत उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी विद्यार्थी मेळावा
सावंतवाडीत उत्साहात
माजी विद्यार्थी मेळावा सावंतवाडीत उत्साहात

माजी विद्यार्थी मेळावा सावंतवाडीत उत्साहात

sakal_logo
By

L21063

- सावंतवाडी ः मिलाग्रीसच्या १९८३-८४ च्या दहावी बॅचचे एकत्र आलेले विद्यार्थी.

माजी विद्यार्थी मेळावा
सावंतवाडीत उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ ः मिलाग्रीस हायस्कूलमधील १९८३-८४ च्या दहावी बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नुकताच येथील हॉटेल शिल्पग्रामच्या आवारात उत्साहात झाला. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ३६ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. कार्यक्रमात व्यासपीठावर माजी शिक्षक आयरीन, मेरी फिलिप्स, क्लारा डिसोझा, श्री. नाडकर्णी, श्री. कालकुंद्रीकर, प्रदीप सिरसाट यासोबत विद्यार्थी चेबिनू देवसया, शिप्रा सावंत, तनुजा शिर्के, शामल दाभोलकर, मिनल रेगे, सुवर्णा तावडे, मेरी डिसोझा, नीता रासकर, बांदेकर, संध्या मोरजकर, लता म्हात्रे, विनया यंदे, प्रमोदिनी पुजारे, फर्नांडिस, उदय नाईक, पीटर फर्नांडिस, अजय नाईक, विलास नर, अनिल कुडाळकर, संतोष ढगळे, संजय कुलकर्णी, जॉनी डिसोजा आदी उपस्थित होते. स्नेहमेळाव्यात माजी शिक्षिका आयरीन यांच्यासह इतर शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेविषयी प्र. के. अत्रे यांची ''ही आवडते मज मनापासून शाळा'' ही कविता शामल दाभोलकर यांनी गायिली. अनिल कुडाळकर यांनी त्यांना साथ दिली.
.....................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57109 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top