
रत्नागिरी-सदर
कोकमचाही फोटो टाकावा.
...
लाल मातीतील शिवार -----------लोगो
..
२८ मे टु ४ वर छोटा फोटो आहे
...
..
-rat11p16.
L21072ः वैभव शिंदे
--------------
21079ः कोकमचे झाड- संग्रहीत
..
कोकम लागवडीला कोकणात पोषक वातावरण
इंट्रो
कोकमाला उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. हिवाळ्यात ज्या ठिकाणी तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा खाली उतरते, तेथे कोकमाची लागवड करू नये. तसेच उन्हाळ्यात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास कोकमाच्यादृष्टीने हानिकारक ठरते. कोरड्या हवामानात कोकमाची लागवड करणे टाळावे. ज्या जमिनीत नारळ व सुपारीची लागवड चांगल्याप्रकारे होते, त्या सर्व जमिनी कोकम लागवडीसाठी उपयुक्त आहेत.
------
कोकम हे स्थानिक मसाला पिक आहे. कोकमच्या फळाची साल आमसूल व आगळासाठी वापरली जाते. याचा वापर दैनंदिन जेवणात केला जातो. कोकणात चिंचेऐवजी कोकम वापरण्याची प्रथा आहे. कोकम हृदयरोगावर अत्यंत गुणकारी आहे. कोकमाच्या बीपासून तेल २३ ते २६ टक्के काढले जाते. त्याला कोकम तेल असे म्हणतात. सर्वसामान्य तापमानात हे तेल घन राहते. तेलाचा वापर अनेक प्रकारच्या त्वचारोगांवर तसेच सौंदर्यप्रसाधनांमध्ये करतात. कोकमाच्या सालीमध्ये हायड्रोक्सिसिट्रिक आम्ल असते, जे स्थूलपणा कमी करते. कोकमची व्यापारी तत्त्वावर झालेली लागवड नसली तरी कोकमाची कोकणात तसेच गोव्यात, उत्तर कर्नाटकात व केरळ राज्यात लागवड आढळते.
नदीकाठच्या गाळाने तयार झालेल्या दरीच्या पायथ्याच्या जमिनीत, डोंगरउताराच्या खालच्या बाजूला जमिनींचा विचार कोकमासाठी प्राधान्याने करावा. ज्या जमिनीत पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही, पावसाळ्यात नदीचे पाणी घुसते, खाजण जमिनी, चूनखडीच्या जमिनी व कातळ जमिनी अथवा अति मुरमाड जमिनी कोकम लागवडीसाठी टाळाव्यात.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकमाच्या कोकण अमृता आणि कोकण हातीस हे वाण प्रसारित केले आहे. कोकम अमृता या जातीची फळे पावसाळ्यापूर्वी तयार होतात. एका झाडापासून सुमारे १०० किलो उत्पन्न मिळते. फळ आकाराने मध्यम असून एका फळाचे सरासरी वजन ३४ ग्रॅम असते. साल भडक लाल रंगाची व जाड असते. फळे मार्च-एप्रिलमध्ये तयार होतात व सुमारे ५ ते ७ दिवस टिकतात. लागवडीसाठी पावसाळ्यापूर्वी तयार होणारी व चांगल्या प्रतीची कोकम फळे असणारी झाडे निवडून त्यापासून रोपे अथवा कलमे लागवडीसाठी वापरावीत. कोकण हातीस या जातीची फळे कोकम अमृतापेक्षा आकाराने मोठी असून, फळधारणा तुलनेने लवकर होते.
...........
* अशी करावी लागवड
कोकमाची लागवड पावसाळ्याच्या सुरवातीला अथवा पावसाळ्यानंतर करावी. अति पावसात लागवड करणे टाळावे. लागवड करताना भरलेल्या खड्ड्याच्या मधोमध कोकमाच्या मुळाची हुंडी बसेल इतकी माती काढावी. प्लास्टिक पिशवी ब्लेडच्या अथवा अन्य साधनाचा वापर करून अलगद गाडावी. मुळाची हुंडी न फुटेल अशाप्रकारे तयार केलेल्या खड्ड्यात अलगद लागवड करावी. रोप लावताना कलमाचा जोड मातीच्या थोडा वर राहील, याची काळजी घ्यावी. रोपे लावताना प्रत्येक खड्ड्यात दोन रोपे लावावीत. लागवड केल्यानंतर कोकमाच्या उंचीइतक्या काठ्या दोन बाजूस सुमारे ३० सें. मी. अंतर सोडून त्या पुराव्यात. या काठ्यांना एक काठी आडवी बांधून त्यावर कोकम कलम बांधावे जेणेकरून वाऱ्याबरोबर ते हलणार नाही. कोकमासभोवती खोडापासून सुमारे १० सें.मी. अंतर सोडून आच्छादन करावे.
(लेखक प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, रत्नागिरी येथे कृषीविद्यावेत्ता आहेत.)
------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57115 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..