रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त
रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

sakal_logo
By

-rat11p14.jpg
L21055
- वैष्णवी जोशी
-------------
संगीत अलंकार परीक्षेत
वैष्णवी जोशी उत्तीर्ण
रत्नागिरी ः येथील वैष्णवी धुंडिराज जोशी हिने शास्त्रीय संगीतातील गायन विषयाची अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत अलंकार ही परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. लहान वयात म्हणजे अवघ्या २१ व्या वर्षी तिने हे यश मिळवल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. वैष्णवीचे गायनातील पहिल्या परीक्षेपासून अलंकारपर्यंतचे शास्त्रीय शिक्षण संगीता बापट यांच्याकडे झाले. ती सध्या वकिलीचे पदव्युत्तर शिक्षण घेत असून शास्त्रीय संगीतात पीएचडी करण्याचा तिचा मानस आहे. त्याकरिता ती पं. रशीद खान यांचे पट्टशिष्य बोंगाणे (खारघर-पनवेल) यांचे मार्गदर्शन घेत आहे. वैष्णवी कथ्थक नृत्यातही विशारद आहे. या सांगितिक प्रवासात आई-वडील व भाऊ यांचा मोलाचा वाटा असल्याचे तिने आवर्जून नमूद केले. रत्नागिरीतील प्रसिद्ध अठरा हाताच्या गणपती मंदिराचे मालक विनायक जोशी यांची नात आहे.
------------
महिला लोकशाही दिन १७ ला
रत्नागिरी ः जिल्हास्तरीय मे महिन्याचा महिला लोकशाही दिन १७ मे रोजी सकाळी ११ ते १ या वेळात जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. या लोकशाही दिनाला अर्जदार महिला स्वतः उपस्थित राहून निवेदन सादर करतात. रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक स्थिती लक्षात घेता, ज्या महिलांना लोकशाहीदिनास प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही, अशा महिलांच्या सोयीच्यादृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांना प्रायोगिक तत्त्वावर फोनद्वारे संपर्क करून या महिला लोकशाहीदिनात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टोल फ्री क्र. १०७७ यावर अर्ज नोंदवता येणार आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे सदस्य सचिव यांनी कळवले आहे.
-----
शास्त्रीय गायन मार्गदर्शन कार्यशाळा
रत्नागिरी ः चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ व खल्वायन रत्नागिरी या संस्थेच्या सहकार्याने आसमंत बेनव्होलन्स फाउंडेशनने शास्त्रीय गायन कार्यशाळा २५ ते २६ सकाळी १० ते १ या वेळेत चित्पावन ब्राह्मण मंडळाच्या भगवान परशुराम सभागृहात आयोजित केली आहे. कार्यशाळेत गायक आणि उस्ताद रशीद खान यांचे पट्टशिष्य युवा कलाकार नागेश आडगावकर मार्गदर्शन करणार आहेत. अधिक माहितीसाठी आसमंत फाउंडेशन येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-----

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57120 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top