संगमेश्वर-नवनिर्माणचे थीम डिनर नाविन्यपूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संगमेश्वर-नवनिर्माणचे थीम डिनर नाविन्यपूर्ण
संगमेश्वर-नवनिर्माणचे थीम डिनर नाविन्यपूर्ण

संगमेश्वर-नवनिर्माणचे थीम डिनर नाविन्यपूर्ण

sakal_logo
By

L21080
ः संगमेश्वर ः नवनिर्माण कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट थीम डिनरचे उद्घाटन करताना मान्यवर.
----------------
नवनिर्माणचे थीम डिनर नाविन्यपूर्णः थोरात

लय भारी कोल्हापुरी डिनर उत्सवाचे तहसीलदारांकडून कौतुक
संगमेश्वर, ता. ११ ः नवनिर्माण शिक्षणसंस्थेच्या कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड हॉस्पिटॅलिटी स्टडिजने आयोजित केलेला थीम डिनरसारखा उत्सव माझ्यासाठी अत्यंत वेगळेपणाचा आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध आहे, असे प्रतिपादन तहसीलदार सुहास थोरात याने केले.
नवनिर्माण शिक्षणसंस्थेच्या कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड हॉस्पिटॅलिटी स्टडिजच्या वतीने लोवले येथे लय भारी कोल्हापुरी या थीम डिनरचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पोलिस निरीक्षक संगमेश्वर उदय झावरे यांनी, विद्यार्थ्यांना आजच्या युगातील किंबहुना इंटरनेट युगातील सायबर क्राईम आणि विद्यार्थी यांच्या संबंधाने उद्भवणाऱ्या काही समस्यांचे विश्लेषण केले. विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा योग्य तो वापर करून कोणत्याही आमिषाला बळी न पडता इंटरनेटचा वापर करावा, असा सल्ला दिला. तसेच इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या वाढत्या गुन्हेगारीची माहिती दिली. नवनिर्माण शिक्षणसंस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांनी व्यवसायाभिमुख अशा विद्यापीठस्तरीय पदवी विषयीची माहिती सांगितली. या वेळी संचालिका सीमा हेगशेट्ये, व्यापारी संघाचे अध्यक्ष शंकर भिंगार्डे, सरपंच ऋतुजा कदम, प्राचार्या रूपाली अणेराव, ज्येष्ठ व्यापारी दिलीप रहाटे, नवनिर्माण नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रज्ञा कदम आदी उपस्थित होते.
------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57123 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top