
रत्नागिरी ः तालु्क्यात 12 दरडग्रस्त तर 4 पूरग्रस्त ठिकाणे
-rat11p2.jpg
20999
-रत्नागिरी ः तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत बोलताना तहसीलदार शशिकांत जाधव.
-----------
तालुक्यात १२ दरडग्रस्त तर ४ पूरग्रस्त ठिकाणे
शशिकांत जाधव; स्थलांतराची ठिकाणे निश्चित करण्याची सूचना
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ ः तालुक्यातील संभाव्य दरडग्रस्त १२ ठिकाणाच्या व ४ पूरग्रस्त ठिकाणांच्या नागरिकांना स्थलांतरित करून सुयोग्य ठिकाणी ठेवण्यासाठीची ठिकाणे निश्चित करून त्यांना मूलभूत सुविधा पुरवण्याबाबत गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी यांना सूचना दिल्या. सर्व तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून संबधित विभागास सादर करण्याचे आदेश दिले. जून ते ऑक्टोबर या कालावधीत २४ बाय ७ नियंत्रण कक्ष सुरू करण्याचे आदेश तहसीलदार शशिकांत जाधव यांनी दिले.
रत्नागिरी तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीची मान्सूनपूर्व आढावा बैठक तहसीलदार शशिकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी ते बोलत होते. बैठकीस तालुकास्तरीय यंत्रणांचे प्रमुख, निवासी नायब तहसीलदार, तहसील कार्यालयातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते. आगामी मान्सून व त्या अनुषंगाने येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीस सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी करावयाच्या पूर्वतयारीबाबत सर्व यंत्रणांना सक्त सूचना देण्यात आल्या. महावितरण विभागाला मुख्य विद्युत वाहिन्यांवर वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटण्याच्या सूचना दिल्या. तसेच नैसर्गिक आपत्तीत आवश्यक साहित्याचा साठा ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
तालुक्यातील संभाव्य १२ दरडग्रस्त ठिकाणाच्या व ४ पूरग्रस्त ठिकाणाच्या नागरिकांना स्थलांतरित करून सुयोग्य ठिकाणी ठेवण्यासाठी ठिकाणे निश्चित करा. त्यांच्यासाठी आवश्यक मूलभूत सुविधा पुरवण्याबाबत गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी यांना सूचना दिल्या. आगामी मान्सून कालावधीत सर्व विभागांनी समन्वयाने कामकाज करण्याचे आवाहन जाधव यांनी केले.
----------
चौकट-
अनुपस्थित विभागांवार कारवाईचा प्रस्ताव
या बैठकीस सूचना देऊनही वनविभाग, सार्वजानिक बांधकाम विभाग, रत्नागिरी तालुक्यातील पोलिस ठाण्यातील प्रमुख अनुपस्थित राहिले. त्याबद्दल तहसीलदार जाधव यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. अनुपस्थित अधिकारी यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाखाली कारवाईचा प्रस्ताव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडे सादर करण्याबाबत तहसीलदारांनी निवासी नायब तहसीलदार रूपा मणचेकर यांना आदेश दिले.
...............
एक दृष्टिक्षेप..
* जून ते ऑक्टोबर या कालावधीत २४ बाय ७ नियंत्रण कक्ष
* नुकसानीचे तत्काळ पंचनाम्याचे आदेश
* वीजवाहिन्यांवरील वाढलेली झाडे तोडा
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57136 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..