
खेड-भरणे-दापोली मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या
-rat11p18.jpg
21082
- खेड ः भरणे-खेड मार्गावर खेड पंचायत समिती ते बसस्थानक भागात झालेली वाहतूक कोंडी.
-------------
भरणे-दापोली मार्गावर वाहतूक कोंडी
अनधिकृत दुकानांचा परिणाम; पर्यटकांना फटका
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ११ : भरणे-खेड-दापोली हा मार्ग खेड शहरातून आहे. परंतु या मार्गावरील पंचायत समिती कार्यालय ते बसस्थानक या भागात गेल्या काही दिवसांत वाहनांची वर्दळ वाढल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. खेड शहरातील रहिवासी व भरणेनाका येथून दापोलीकडे पर्यटनासाठी जाणारे वाहन चालक वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे त्रस्त झाले आहेत.
शहरातील भरणे-खेड-दापोली मार्गाच्या दोन्ही बाजूने शहरात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक अनेक अनधिकृत दुकाने उभी राहिली आहेत. त्यामुळे या दुकानांमध्ये खरेदीसाठी थांबणारे ग्राहक दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यालगत उभी करून रहदारीला अडथळा निर्माण करत आहेत. परिणामी या मार्गावर सतत वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. बसस्थानकाच्या बाजारपेठेच्या बाजूने बस स्थानकात जाताना व दापोली मार्गाच्या बाजूने एसटी बसेस बाहेर पडताना वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाल्याने याबाबत संबंधित यंत्रणांनी तत्काळ लक्ष देण्याची मागणी वाहन चालक करत आहेत.
----------
चौकट
वाहन चालकांची तारेवरची कसरत
भरणेनाका येथून खेडच्या दिशेने निघाल्यानंतर खेड पंचायत समिती कार्यालयासमोर आल्यानंतर पुढे वाहतूक धीम्यागतीने सरकत असल्याने रस्ता रुंदीकरण किंवा पर्यायी रस्त्याची गरज भासू लागली आहे. सकाळी ११ ते ७ या कालावधीत भरणे-खेड मार्गावर वाहनांची वर्दळ असते. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर या मार्गावर पुन्हा एसटीची ये-जा सुरू झाली आहे. रस्ता अरुंद असल्याने दोन एसटी बसेस समोरासमोर आल्यानंतर या मार्गावरून ये-जा करणाऱ्या दुचाकी व चारचाकी लहान वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57137 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..