
रत्नागिरी-मासळीचे दर वधारले
असनी वादळाचा परिणामः लोगो
...
rat11p17.jpg
21081
- रत्नागिरी ः येथील मिरकरवाडा बंदरामध्ये मासळी विक्रीसाठी बसलेले विक्रेते.
--------------
21090ः संग्रहीत
...
समुद्र खवळला; मासेमारीत अडथळा
मासळीचे दर गगनाला; पर्यटक नाराज, एक किलो सुरमईसाठी मोजावे लागताहेत ९०० रुपये
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. 11 ः ‘असनी’ चक्रीवादळामुळे समुद्र खवळला असून त्याचा मासेमारीवर परिणाम झाला आहे. मोजक्याच नौका मासेमारीसाठी जात असल्याने मासळीचे दर गगनाला भिडले आहेत. एक किलो सुरमईसाठी नागरिकांना नऊशे रुपये मोजावे लागत आहेत. वादळाचा परिणाम अजून दोन राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे त्या किनारपट्टीवर असनी चक्रीवादळ तयार झाले आहे. त्यामुळे खोल समुद्रातील वातावरण बिघडले असून उंचच उंच लाटा निर्माण होत आहे. परिणामी मच्छीमारांनी खोल समुद्रात जाणे टाळले आहे. गेले दोन ही परिस्थिती आहे. अरबी समुद्रातही त्या वादळाचा प्रभाव जाणवत असून पाण्याला प्रचंड करंट आहे. हवामान विभागाकडून मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार अनेक मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीला जाणे टाळले. त्यामुळे मिरकरवाडासह छोट्या-मोठ्या बंदरावर मासळीची आवक घटलेली आहे.
मिरकरवाडा येथे दर दिवशी लाखो रुपयांची उलाढाल होते. गेल्या दोन दिवसांत मासळीच कमी असल्याने दरही वधारले आहेत. एक किलो सुरमई ६०० रुपयांवरुन ९०० रुपयांवर गेली आहे. ९०० रुपये किलो पापलेट आता १२०० ते १५०० रुपयांनी मिळत आहे. शंभर रुपयांमध्ये मिळणाऱ्या सहा बांगड्यांना २५० रुपये मोजावे लागत आहे. अन्य प्रकारच्या मासळीचेही दरही वाढले असल्याने खवय्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
...
चौकट
पर्यटकांना वाढलेल्या दराचा फटका
सुट्टीसाठी हजारो पर्यटक कोकणात आले असून त्यांना या वाढलेल्या दराचा फटका बसत आहे. मासळीचे दर वाढल्यामुळे मच्छी थाळीचा दरही वधारलेला असतो. वादळ शमले असले तरीही पावसाळी वातावरण आणखीन दोन दिवस राहील, असा अंदाज आहे.
---
चौकट
आंबा बागायतदारांची तारेवर कसरत
रत्नागिरीत गेले दोन दिवस ढगाळ वातावरण आहे. बुधवारी (ता. ११) दुपारी काही भागात हलका पाऊस झाला. परंतु दिवसभर पावसाळी वातावरण होते. किनारपट्टी भागात हलके वारेही वाहत होते. त्यामुळे आंबा बागायतदार धास्तावलेले आहेत. पावसामध्ये आंबा सापडून नुकसान टाळण्यासाठी काढणीला वेग आला होता. आंबा काढण्याचे नियोजन करताना बागायतदारांना तारेवर कसरत करावी लागत आहे.
...
कोट
वातावरण बदलल्यामुळे बहुसंख्य नौका बंदरातच उभ्या आहेत. समुद्र खवळल्यामुळे मासे स्थलांतरfत होतात. या कालावधीत मासळी मिळत नाही.
- इम्रान मुकादम, मच्छीमार
..
ग्राफ करावा
...
चौकट
वाढलेल्या दरावर एक नजर..
एक किलो सुरमई ः ९०० रुपयांवर
पापलेटः १५०० रुपये किलो
सहा बांगडेः २५० रुपये
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57138 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..