खेड-जलजीवनमधील नळ जोडणी मोफतच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-जलजीवनमधील नळ जोडणी मोफतच
खेड-जलजीवनमधील नळ जोडणी मोफतच

खेड-जलजीवनमधील नळ जोडणी मोफतच

sakal_logo
By

नळ चित्र वापरा
...
जलजीवनमधील नळ जोडणी मोफतच

ग्रामपंचायतींना सूचना; मानवाधिकार संघटनेचा पाठपुरावा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ११ : जलजीवन मिशन ही योजना राबविण्याचे काम वेगाने सुरू आहे. योजनेचे स्वरूप पाहता प्रत्येक घरामध्ये मोफत नळ जोडणी द्यावयची आहे. यासाठी कोणतेही शुल्क घ्यायचे नाही, अशा सूचना तालुक्यातील ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.
ही योजना राबविण्यासाठी नियोजित केलेल्या कंत्राटदार व ग्रामपंचायतींकडून योजनेची माहिती चुकीच्या पद्धतीने खेड तालुक्यातील ग्रामस्थांना दिली जात आहे. त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत असल्याचे निवेदन येथील मानवाधिकार संघटनेकडून पाणी पुरवठा विभागाला देण्यात आले होते. त्याबाबत विभागाने तत्काळ दखल घेत ग्रामपंचायतींना सूचना दिल्या आहेत.
जलजीवन मिशन अंतर्गत घरोघरी नळजोडणी हे काम १५ वा वित्त आयोग ग्रामपंचायतस्तर अंदाजपत्रकानुसार चालू करण्यात आले आहे. या कामांचे कार्यारंभ आदेश ग्रामपंचायतस्तरावरून देण्यात आले आहेत. तरीही प्रमुख पाणी वाहिनीपासून फक्त १२ मिटरपर्यंतच जोडणी द्यायची असून घरापर्यंत जोडणी पाहिजे असल्यास ग्रामस्थांना पैसे द्यावे लागतील, अशाप्रकारे दिशाभूल करून तालुक्यातील काही ग्रामस्थांकडून रक्कम घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर मानवाधिकार संघटनेने पाणीपुरवठा विभागाला निवेदन दिले होते. याबाबत ग्रामस्थांची समस्या मांडणारे अध्यक्ष किरण तायडे, महिला तालुकाध्यक्ष अंकिता शिगवण, जिल्हा महिलाध्यक्ष राजश्री पाटणे, युवक अध्यक्ष अरबाज बडे, सदस्य आताउल्ला तिसेकर यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57144 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top