टुडे पान एक-सावंतवाडीतील मंजूर कामे अपूर्णच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे पान एक-सावंतवाडीतील मंजूर कामे अपूर्णच
टुडे पान एक-सावंतवाडीतील मंजूर कामे अपूर्णच

टुडे पान एक-सावंतवाडीतील मंजूर कामे अपूर्णच

sakal_logo
By

21087
सिंधुदुर्गनगरी : येथे जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांना निवेदन देताना संजू परब.

सावंतवाडीतील मंजूर कामे अपूर्णच

संजू परब ः जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष

सावंतवाडी, ता. ११ ः नगराध्यक्ष पदाच्या काळात सावंतवाडीत मंजूर कार्यान्वित कामे बंद असल्याबाबत संजू परब यांनी आज जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांचे लक्ष वेधले. ही कामे तत्काळ सुरू करून मार्गी लावावी, अशी मागणी केली. याबाबतचे निवेदन त्यांनी सादर केले. येथील पालिकेच्या शिवउद्यानात बसवलेल्या खेळण्यांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला नसल्याबाबतही श्री. परब यांनी जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले.
सावंतवाडी नगराध्यक्ष असताना परब यांनी विविध विकासकामांना मंजुरी मिळवली होती. काही कामांना प्रत्यक्षात सुरुवातही केली होती; मात्र सद्यस्थितीत बरीच कामे बंद असून मंजूर केलेल्या कामांना वर्क ऑर्डर देऊनही ती अद्याप सुरू झाली नाहीत. एकूणच या प्रश्नी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत आज माजी नगराध्यक्ष परब यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. यावेळी सकारात्मक चर्चा होऊन या कामांबाबत तात्काळ सुचना करण्याचे आश्वासन दिले. निवेदनात सावंतवाडी पालकेच्या जनरल जगन्नाथराव भोसले स्मृतिउद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतराचे काम वर्क ऑर्डर देऊनही अद्याप सुरू नाही, मोती तलावातील श्रीराम वाचन मंदिर समोरील सेल्फी पॉइंटचे काम अद्याप अपूर्ण, गेली कित्येक दिवसापासून गांधी चौक परिसरातील नाला दुरुस्तीचे काम बंद, पालिकेच्या जिमखाना स्पोर्ट कॉम्प्लेक्समधील स्विमिंग पूलाचे उद्घाटन होऊनही अद्यापही ते बंद, पर्यटनाच्या माध्यमातून उभारण्यात आलेला हेल्थपार्क प्रकल्प बंद, या कामासंदर्भात लक्ष वेधण्यात आला आहे. यावेळी आनंद नेवगी मनोज नाईक, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.
--------
चौकट
चौकशी अहवालाची प्रतीक्षाच
शिवउद्यानात बसवलेल्या खेळण्यांमध्ये झालेला भ्रष्टाचाराबाबत आवाज उठवल्यानंतर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीने संबंधित कामाची पाहणी केल्यानंतर त्यांनी तयार केलेला चौकशी अहवाल अद्यापही प्राप्त झाला नसल्याचेही परब यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57145 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top