
कुंब्रलमध्ये मंगळवारी पर्यटन महोत्सव
कुंब्रलमध्ये मंगळवारी पर्यटन महोत्सव
सावंतवाडी, ता. ११ ः सप्तधारा पर्यटन सेवा सहकारी संस्थेच्यावतीने दोडामार्ग तालुक्यातील कृषी व निसर्ग पर्यटन वृध्दिंगत होण्याच्या उद्देशाने एक दिवसीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा महोत्सव मंगळवारी (ता. १७) सकाळी साडेदहाला कुंब्रल (ता. दोडामार्ग) येथे होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. मुंबई हायकोर्ट वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. एकनाथ सावंत तसेच सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले प्रमुख अतिथी असणार आहेत. माजी राज्य मंत्री प्रवीण भोसले, सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य संपदा देसाई, माजी पंचायत समिती सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य बाबुराव धुरी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, ‘सकाळ’चे वरिष्ठ उपसंपादक शिवप्रसाद देसाई, पर्यटन व पर्यावरण अभ्यासक प्रसाद गावडे (रानमाणूस) यांची विशेष उपस्थिती असणार आहे. रात्री नऊला सांस्कृतिक कार्यक्रम, उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभ होणार असून, याचे उद्धाटन माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. उद्योजक तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक गणपत देसाई हे अध्यक्षस्थानी आहेत. सायंकाळी चारला महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व ‘खेळ पैठणीचा’, रात्री दहाला शिवगणेश प्रॉडक्शन, सिंधुदुर्ग-मुंबई निर्मित, वसंत कानेटकर लिखित ऐतिहासिक ‘इथे ओशाळला मृत्यू’ नाट्यप्रयोग होणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57151 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..