१ सं पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१ सं पट्टा
१ सं पट्टा

१ सं पट्टा

sakal_logo
By

माडखोल येथे
युवकांचे रक्तदान
ओटवणे ः माडखोल फुगीबाजार येथील आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचे आयोजन माडखोल येथील श्री देवी भराडी युवा कला-क्रीडा मंडळ (डुंगेवाडी), जय मल्हार मंडळ (धनगरवाडी), फुगीबाजार मित्रमंडळ, देऊळवाडी, फौजदारवाडी, ठाकुरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते. यावेळी राजकुमार राऊळ, कृषी उत्पन्न बाजार समिती व्हाईस चेअरमन जॅकी डिसोजा, माडखोल माजी सरपंच संजय लाड, सूर्यकांत राऊळ, रोहित गोताड, संतोष राऊळ, मसाजी राऊळ, सुबोध राऊळ, सागर येडगे, विशाल राऊळ, वासुदेव होडावडेकर, महेश राऊळ, रुपेश ठाकुर, वैभव राऊळ, स्वप्नील होडावडेकर, सावंतवाडी रक्तपेढीच्या तंत्रज्ञ प्राजक्ता रेडकर, श्री. बागेवाडी, डॉ. आकाश खाडे, अस्लम शेख आदी उपस्थित होते.
--
मालवणात १४ला
टेबलटेनिस स्पर्धा
मालवण ः येथील भंडारी हायस्कूल शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त भंडारी हायस्कूल, सुवर्णमहोत्सवी एसएससी बॅच १९७१-७२ चे माजी विद्यार्थी प्रायोजित आणि महासिंधू टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्गतर्फे विभागस्तरीय टेबलटेनिस स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे उद्घाटन १४ मेस सकाळी ९ वाजता भंडारी हायस्कूल येथे होणार आहे. उद्घाटन ममता प्रभू (टेबल टेनिस प्रशिक्षक, महिला विभाग) यांच्या हस्ते होणार आहे. भंडारी एज्युकेशन सोसायटी, मालवणचे सेक्रेटरी साबाजी करलकर, मुख्याध्यापक व्ही. जी. खोत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
---
वाघसावंतटेंबला
विविध कार्यक्रम
कुडाळ ः कुडाळ-वाघसावंतटेंब येथील सावंत-प्रभावळकर राजघराण्याची कुलस्वामिनी श्री देवी भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ शुक्रवारी (ता.१३) होणार आहे. यानिमित्त १२ ला सकाळी आठला नित्यपूजा, नऊला शक्तीपाठ वाचन, अकराला कुंकूमार्चन, दुपारी दोनला आरती व नैवेद्य, सकाळी सातला नित्यपूजा, मानाची ओटी भरुन इतर ओट्या भरण्याचा कार्यक्रम, सायंकाळी सहाला महानैवेद्य, सातला देवीचा मांड भरणे, दिवटी पाजळून ढोलताशांच्या गजरात देवीचे आगमन व रात्री महाप्रसाद होणार आहे.
--
तळाशीलमध्ये
क्रिकेट स्पर्धा
मालवण ः तळाशील क्रिकेट क्लब आयोजित खुली अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा १५ ते १७ मे या कालावधीत तळाशील आवारानजीक आयोजित केरली आहे. विजेत्या संघास ३० हजार, उपविजेत्या संघास १५ हजार, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकांना प्रत्येकी ५ हजार रुपये व प्रत्येकी चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57155 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top