
मधू वालावलकर पुरस्कार श्रीकांत सांबारी यांना प्रदान
L२१०८६
ओळ - आचरा ः श्रीकांत सांबारी यांना पुरस्कार प्रदान करताना मान्यवर.
मधू वालावलकर पुरस्कार
श्रीकांत सांबारी यांना प्रदान
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ११ ः समाजामध्ये माणसे स्वार्थी होत आहेत. परोपकारी माणसे मिळणे दुर्मिळ होत आहे. आपण जेव्हा समाजाचे होतो, तेव्हाच समाज आपल्यावर प्रेम करतो. समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तिमत्वांच्या गौरवातून प्रेरणा मिळावी, यासाठी मधू वालावलकर समाज सेवक पुरस्कार दिला जातो, असे प्रतिपादन बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष देवदत्त परुळेकर यांनी येथे व्यक्त केले. बॅ. नाथ पै सेवांगणचा मधू वालावलकर समाज सेवक पुरस्कार श्रीकांत सांबारी यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बाबाजी भिसळे, श्रीकांत सांबारी, सौ. वैशाली सांबारी, लक्ष्मीकांत खोबरेकर, ऋतुजा, बाबू अवसरे, आचरा उपसरपंच पाडुरंग वायंगणकर, सुरेश ठाकुर, नितीन वाळके, प्रकाश कुशे, सुभाष सांबारी, उर्मिला सांबारी, ज्येष्ठ नागरिक संघाचे अशोक कांबळी, आचरा व्यापारी संघटनेचे अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर, राजन गावकर, अनिल करंजे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मधुमंगेश कर्णिक यांनी लिहिलेला, वालावलकर यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व उलगडणारा लेख मधुरा माणगावकर यांनी वाचून दाखविला. यावेळी बोलताना श्रीकांत सांबारी यांनी थोर समाजसेवक मधू वालावलकर यांच्या नावाने पुरस्कार मिळाल्याने स्वतःला भाग्यवान समजतो. जोपर्यंत काम करण्याची ताकद आहे, तोपर्यंत समाजसेवेचे व्रत अखंड सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.
................
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57173 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..